शिखर बँक घोटाळा प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(scam) यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या क्लीन चीटला आता ईडीने विरोध केला आहे. क्लोजर रिपोर्टमुळे आमच्या तपासावर परिणाम होईल, असं म्हणत ईडीने कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे(scam) शाखेने २५ हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. यामध्ये कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीमुळे बँकेला कोणतंही नुकसान झालं नाही. तसे पुरावे देखील नसल्याचं आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलं होतं.
त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह बँकेतील इतर ८० जणांना क्लीन चीट देण्यात आली होती. मात्र, आता ईडीने या क्लीन चीटला विरोध केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत ईडीने पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे. क्लोजर रिपोर्टमुळे आमच्या तपासावर परिणाम होईल, असं ईडीने अर्जात म्हटलं आहे.
दरम्यान, ईडीच्या या हस्तक्षेप याचिकेमुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँकेत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यावेळच्या विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता. राज्यात भाजप सरकार पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर अजित पवार यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर याप्रकरणी पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल झाला होता. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येताच पुन्हा तपास करायचा आहे, असं मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितल होतं. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास पूर्ण करत अजित पवार यांना क्लीन चीट दिली होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ऑर्गनायझर’ मधील एका लेखात राज्यातील लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या खराब कामगिरीचे श्रेय अजित पवारांसोबतच्या युतीला दिल्याच्या आणि राज्यातील भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला महायुतीतून राष्ट्रवादीला काढून टाकण्याचा आग्रह केल्याचे वृत्त असताना ही घटना घडली आहे. त्यानंतर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर याप्रकरणी पहिला क्लोजर रिपोर्ट दाखल झाला होता.
हेही वाचा :
मनोज जरांगे यांच्या मातोरी गावात गुरुवारी संध्याकाळी दगडफेक झाल्याची घटना,अनेक गाड्यांचे नुकसान
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आणीबाणीविषयी आक्रामक टिप्पणी, संसदेत चर्चा सुरू
लक्ष्मण हाके आणि आबासाहेब वाघमारे यांची अभिवादन यात्रा स्थगित, पुन्हा सुरुवात तारखेला