राज्यात आज मतदान पार पडत असतानाच एका आरोपाने राज्यभर खळबळ(political circles) उडाली आहे. पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलाय. निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा व अनेक आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप सुळे यांच्यावर करण्यात आला आहे.
त्यानंतर भाजपा खासदार व प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन या आरोपांबाबत मोठा दावा केला. यासंबंधी त्यांनी कथित पुरावे म्हणून काही कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट देखील सादर केले. या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ(political circles) उडाली आहे. आज मतदान करण्याचा दिवस असून त्याच्या आदल्या रात्री असे आरोप करण्यात आल्याने राज्यभर याची चर्चा रंगली आहे.
अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सुप्रिया सुळे यांच्यावर मोठा आरोप केलाय. सुधांशू त्रिवेदी यांनी कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट दाखवले होते. सदर ऑडिओ क्लिपमधील आवाज हा माझ्या बहिणीचा असल्याचा दावा अजित पवार यांनी केलाय. ऑडिओ क्लिपमध्ये सुप्रिया सुळेंचा आवाज असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.
आज बारामतीमध्ये अजित पवार यांनी मतदानाचा हक्का बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुप्रिया सुळेंच्या कथित ऑडिओ क्लिपबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर “सदर ऑडिओ क्लिपमध्ये ज्या दोन लोकांचे आवाज ऐकू येत आहेत. त्यांना मी ओळखतो. एक आवाज माझ्या बहिणीचा आहे. तर दुसरा आवाज विधानसभेतील माझ्या एका सहकाऱ्याचा आहे.तसेच मधल्या काळात ते भाजपाचे खासदारही होते.”, असं अजित पवार म्हणाले.
तसेच, या प्रकरणाची सरकारकडून चौकशी केली जाईल. त्यानंतर सत्य समोर येईल असंही अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवारांच्या या दाव्याने बारामतीसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी या संदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे.
“भाजपाच्या सुधांशू त्रिवेदी यांनी केलेले आरोप निराधार आहेत. मात्र मला त्याचं आश्चर्य वाटत नाही कारण मतदानाच्या पूर्वसंथ्येला अशा प्रकारचे आरोप नेहमीच केले जातात. त्यांच्याकडून (भाजपा) अशा प्रकारे खोटी माहिती पसरवण्याचे प्रयत्न नेहमीच होतात. त्यांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष न करता मी त्यांच्याविरोधात खटला दाखल करणार आहे. माझे वकील त्यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी व दिवाणी खटला भरतील.”, असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलंय.
हेही वाचा :
नाईलाज! स्वत:लाच मतदान करू शकणार नाहीत फडणवीस, ठाकरे; पण असं का?
मतदानाच्या दिवशी, रायगडमध्ये देवदेवस्कीचा प्रकार? रस्त्यावर मडकी रचून ठेवली आणि…
निवडणूक आयोगाच्या ‘नॅशनल आयकॉन’ने कुटुंबासोबत केले मतदान, सचिन तेंडुलकरने केले जनतेला आवाहन