‘अजितदादांनी शब्द फिरवला’; भाजपाची यादी जाहीर होताच समर्थकांची बंडाची भूमिका

महाराष्ट्रातील विधानसभा(political news todays) निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. कालच, (20 ऑक्टोबर) भाजपाने आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 99 नावे असून त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राम कदम अशा प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

मात्र, भाजपची(political news todays) यादी जाहीर होताच महायुतीमधील अजित पवार पक्षात बंड सुरू झालं आहे. चिंचवड विधानसभेत महायुतीला मोठा धक्का बसणार असल्याचं चित्र दिसून येतंय. चिंचवड विधानसभेत महायुतीने भाजपच्या शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर राष्ट्रवादीने काही तासांतच बैठक बोलावत नाराजी जाहीर केली.

अजित पवारांच्या समर्थकांनी बंडाची भूमिका घेतली आहे. काहीही झालं तरी आम्हाला भाजपचा प्रचार करायचा नाही, त्यामुळे महाविकास आघाडी आमच्यातील ज्याला उमेदवारी देईल, आम्ही त्यांचाच प्रचार करु. अशी भूमिकाच अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे. यामुळे महायुतीची चिंता वाढली आहे.

या बैठकीत नाना काटे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे या इच्छुक उमेदवारांसह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत पुढची भूमिका जाहीर करण्याचा निर्णय घेतलाय. नाना काटे यांनी यावेळी म्हटलं की, अजितदादांनी आम्हाला मतदारांच्या संपर्कात राहण्यास सांगितलं. आम्ही त्या पद्धतीने काम देखील केलं. मात्र, भाजपचा उमेदवार जाही झाला. आम्हाला दिलेला शब्द फिरवला गेला. त्यामुळे आमची भूमिका ठाम आहे. आमच्यापैकी एक उमेदवार आम्ही देऊ आणि त्याचाच प्रचार करू, अशी भूमिकाच अजित पवार समर्थकांनी घेतली आहे.

आम्हाला आमच्या पक्षासाठी योग्य निर्णय मिळाला नाही तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा देखील अजित पवारांच्या समर्थकांनी दिला आहे. तसेच अजित पवार गटातील काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची देखील भेट घेतली आहे. त्यामुळे अजित पवार समर्थक बंड करण्याच्या तयारीत असल्याचं यामुळे बोललं जातंय. याचा अजित पवार यांच्यासह महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:.

‘…तर मी जावेद अख्तर यांच्याशी लग्न करेन’; विद्या बालन ‘हे’ काय बोलून गेली

गर्लफ्रेंडने नस कापून पाठवला व्हिडीओ, बॉयफ्रेंडची आत्महत्या

मोठी बातमी! ‘या’ मेट्रो स्थानकाला भीषण आग, मोदींनी नुकतंच केलतं उद्घाटन