काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षाचे नाव जाहीर होताच, दुसरीकडे राज्यात बड्या (movements)हालचाली सुरू झाल्या आहेत. बंटीदादा सपकाळ यांना राष्ट्रवादीने मराठवाड्यात हाबाडा दिला. हर्षवर्धन सपकाळ यांच्या पक्षाच्या माजी आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गळ घालण्यास सुरवात करण्यात आली आहे. काँग्रेस पक्ष पोखरायला राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुरूवात झाली आहे. कॉंग्रेस पक्षातील विधानसभेतील पराभूत माजी आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गळ घातला आहे.

सुरेश कुमार जेथलिया राष्ट्रवादीत
परतूर विधानसभेचे कॉंग्रेस चे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांचा उद्या अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. परतुर- मंठा मतदारसंघचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते सुरेशकुमार जेथलिया हे उद्या परतुर मध्ये सकाळी 10 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार (movements)गटात प्रवेश करणार आहेत.सुरेश जेथलिया हे 2009 ते 14 या कालावधीत परतूरचे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते.

स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मोर्चेबांधणी
जेथलिया हे माजी मंत्री बबनराव लोणीकरांचे कट्टर विरोधक आहेत. आगामी काळात परतूर नगरपालिकेवर सत्ता काबीज करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे हे शिंदे गटात दाखल झाले आणि उद्या सुरेश जेथलिया दादा गटात प्रवेश करणार असल्याने दोन्ही विरोधक सत्ताधारी गटात आल्याने बबनराव लोणीकर यांच्यासमोर मोठे आव्हान उभं ठाकले आहे.

मोहन हंबरडे यांचा पण राष्ट्रवादीत प्रवेश
२८ फेब्रुवारी रोजी उत्तर नांदेड विधानसभा मतदार (movements)संघाचे काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबरडे यांचा नांदेडमध्ये अजित पवार यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डी येथे झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात काँग्रेस पक्षातील अनेक मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश आगामी काळात होणार असं सूचक विधान केलं होतं. त्यानंतर एका मागून एक पक्ष प्रवेश होत आहेत.
हेही वाचा :
बड्या चित्रपटासाठी मोनालिसाला आली ऑफर, मिळणार ‘एवढ्या’ लाखाचं मानधन
अमूल दूधाच्या किंमतीत घट?, जाणून घ्या नवे दर
पवारांशी आघाडी करताना विचार करायला हवा होता, आता पक्ष…; माजी आमदाराचा ठाकरेंना घरचा आहेर