अजितदादांची जबरदस्त खेळी, मविआतील ‘या’ बड्या नेत्यांविरोधात टाकला मोठा डाव

अजित पवार(politics) गटाने आज 25 ऑक्टोबररोजी दुसरी यादी जाहीर करून तूफान खेळी खेळली आहे. आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एकाच तासात चार मोठे पक्षप्रवेश झाले. पक्ष प्रवेश होताच त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे. यातून अजितदादांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष इशाराच दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत(politics) भाजपचे नेते तथा माजी खासदार संजय काका पाटील, झिशान सिद्दिकी, सांगलीचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर लगेचच या चारही नेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा : या मतदार संघात नुकत्याच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या माजी खासदार संजय काका पाटील यांना अजितदादांनी उमेदवारी जाहीर केली आहे.येथे संजय काका पाटील विरुद्ध रोहित पाटील यांच्यात लढत होणार आहे.

वांद्रे पूर्व विधानसभा : या मतदारसंघाचे विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर अवघ्या तासाभरातच त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. झिशान सिद्दिकी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे वरुण सरदेसाई यांना आव्हान देतील.

इस्लामपूर मतदारसंघ : भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांनी प्रवेश करताच निशिकांत पाटील यांना इस्लामपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघामध्ये जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील अशी लढत होणार आहे.

कंधार मतदारसंघ : भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. यानंतर त्यांना लगेच उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे आता लोहा कंधार मतदारसंघामधून निवडणूक लढवतील.

अणुशक्तीनगर विधानसभा : अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक देखील विधानसभा निवडणूक लढणार आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा :

विधानसभा निवडणुकीच असं हे “करवीर” महात्म्य

दिवाळीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेपासून 24 तास मिळणार वीज

क्षणार्धात मृत्यूने गाठलं! तरुणाने अचानक काही सेकंदातच मित्रांसमोर सोडले प्राण Video