मुंबई: प्रतिष्ठित ताज हॉटेलमध्ये ‘अमेझिंग भारत’ या संस्थेकडून आयोजित कार्यक्रमात माईंड ट्रेनर अजितकुमार पाटील यांना “अमेझिंग इंडियन पर्सनॅलिटी” या सन्मानाने गौरविण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्यानंतर माईंड ट्रेनर अजितकुमार पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले, “हा सन्मान मिळाल्याचा मला अत्यंत आनंद आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले. मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे.”
‘अमेझिंग भारत’ ही संस्था गेल्या नऊ वर्षांपासून आपल्या कार्यामुळे प्रेरणादायी असलेल्या व्यक्तींना सन्मानित करत आहे. या वर्षीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुंबई पोलिस महासंचालक, ‘द कपिल शर्मा शो’ चे प्रोड्युसर, बॉलिवूडमधील मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होते.
या पुरस्काराने माईंड ट्रेनर अजितकुमार पाटील यांना त्यांच्या कार्यासाठी आणि समाजसेवेसाठी मोठा पाठिंबा मिळाला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी आपल्या मिशनसाठी मिळालेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानले.