नवी दिल्ली – भारतातील विद्यार्थ्यांच्या (students)आत्महत्यांचा वाढता दर हा देशाच्या लोकसंख्या वाढीपेक्षाही जास्त असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. यामुळे देशातील शिक्षण व्यवस्थेतील दबावाकडे आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या दशकात भारतातील लोकसंख्या वाढ १२.२% होती, तर त्याच कालावधीत विद्यार्थी आत्महत्यांची संख्या तब्बल २४% ने वाढली आहे. या चिंताजनक आकडेवारीमुळे सरकार, शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
तज्ज्ञांच्या मते, स्पर्धात्मक परीक्षांचा वाढता दबाव, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, कौटुंबिक अपेक्षा आणि सामाजिक दबाव हे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे प्रमुख घटक आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करणे, विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.
सरकारने या दिशेने काही पावले उचलली असली तरी अजून बरेच काही करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन आणि सर्वांच्या सहभागाची आवश्यकता आहे.
हेही वाचा:
बदलापूर घटनेवरून अजित पवारांचा इशारा: “अधिकाऱ्यांनाही सोडणार नाही, चक्की पिसायला लावणार”
राणे यांचा संताप; ‘घरात ओढून एकेकाला रात्रभर मारून टाकेन’, आव्हाडांचा व्हिडीओ ट्विट….
इचलकरंजीत मनसेच्या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन; उत्कृष्ट रिल्ससाठी विशेष बक्षीस