ओबीसी आरक्षणासाठी राज्यव्यापी जनआंदोलनाचा इशारा

पुणे, ४ जुलै: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला (government)दणका देण्यासाठी राज्यभर जनआंदोलन उभारण्याचा इशारा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. पंचायत राज आणि शिक्षण-नोकरीतील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर शासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने हाके आक्रमक झाले आहेत. ते म्हणाले, “आमचे हक्क आणि अधिकार टिकले पाहिजेत. यासाठी आम्ही राज्यभरात जनजागृती करून ओबीसी बांधवांना एकत्र करू. गरज पडल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारू.”

हाके यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी त्यांनी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ओबीसी बांधवांशी संवाद साधण्याचा मनोदय व्यक्त केला.

हेही वाचा :

कोल्हापूर पोलिसांनी न्यूटन कंपनीच्या संचालकाला फसवणुकीच्या आरोपाखाली केली अटक

वारकऱ्यांसाठी राज्य सरकारची नवी योजना: ‘या’ वाहनांना मिळणार टोल माफी

पिझ्झा सोबत छोट्या पाकीटात मिळणारे ओरेगॅनो आता घरीच बनवा, सोपे व स्वादिष्ट रेसिपी