भारती एअरटेल आणि ॲपल यांनी एक धोरणात्मक भागीदारी केली आहे. या भागीदारीनंतर आता एअरटेल(Airtel plan) ग्राहकांसाठी ॲपल टीव्ही + स्ट्रीमिंग सेवा आणि ॲपल म्युझिक उपलब्ध करून दिलं जाणार आहे. 999 रुपयांपासून सुरु होणारे प्लॅन्स खरेदी केलेल्या सर्व होम वाय-फाय ग्राहकांना ॲपल टीव्ही+ चे आकर्षक विषय पाहता येणार आहेत आणि फिरतीवर असताना अनेक डिव्हाइसेसवर विषय स्ट्रीम करण्याचा पर्याय देखील मिळणार आहे.

याशिवाय, 999 रुपयांपासून सुरू होणारे प्लॅन्स घेतलेल्या पोस्टपेड ग्राहकांना ॲपल टीव्ही+ पाहता येणार आहे आणि भारतीय व जागतिक संगीताचा मोठा कॅटलॉग असलेल्या ॲपल म्युझिकचा आनंद 6 महिन्यांसाठी विनामूल्य उपभोगता येणार आहे. त्यामgळे भारती एअरटेल(Airtel plan)आणि ॲपलची ही भागिदारी त्यांच्या ग्राहकांसाठी प्रचंड फायद्याची ठरणार आहे.
ॲपल सोबतच्या या धोरणात्मक भागीदारीमुळे एअरटेल ग्राहकांना खास प्रीमियम मनोरंजनाचा आनंद मिळणार आहे. ग्राहकांना आकर्षक नाटक (ड्रामा) आणि विनोदी मालिका (कॉमेडी सीरिज), कथाचित्रपट (फीचर फिल्म्स), अभूतपूर्व माहितीपट (डॉक्युमेंटरी) आणि मुलांचे व कौटुंबिक मनोरंजन पहायला मिळणार आहे. याव्यशिवाय, ॲपल म्युझिकची इंग्रजी, हिंदी आणि इतर अनेक भाषांमध्ये अजोड लायब्ररी एक अद्वितीय ऑडिओ अनुभव सुनिश्चित करते.
सिद्धार्थ शर्मा- चीफ मार्केटिंग ऑफिसर आणि सीईओ – कनेक्टेड होम्स, भारती एअरटेल म्हणाले की, “आमच्या ग्राहकांसाठी खास करून त्यांचे अतिशय कौतुक केले गेलेले व्हिडिओ आणि संगीत विषय सादर करून आम्ही अगदी उत्सुकतेने ॲपलसोबत कायापालट करून टाकणारी भागीदारी जाहीर करीत आहोत. हा सहयोग आमच्या लाखो होम वाय-फाय आणि पोस्टपेड ग्राहकांना एक विलक्षण संधी उपलब्ध करून देत आहे आणि यामुळे त्यांना ॲपलच्या प्रीमियम विषयाचा कॅटलॉग उपलब्ध होणार आहे.
आम्हाला खात्री आहे की ही भागीदारी आमच्या ग्राहकांना एक उत्तम अनुभव देणार आहे आणि ग्राहकांमध्ये मनोरंजन अनुभवांसाठी एक नवीन मानक स्थापित करेल. आम्ही मिळून आमच्या बहुमूल्य ग्राहकांसाठी प्रीमियम मनोरंजन परिसंस्था प्रदान करण्याचे उद्दीष्ट ठेवलेले आहे.”
शालिनी पोद्दार, संचालिका, कंटेंट अँड सर्व्हिसेस, ॲपल इंडिया म्हणाल्या, “आम्ही उत्सुकतेने लाखो वापरकर्त्यांपर्यंत सर्वोत्कृष्ट संगीत सेवा, प्रीमियम टीव्ही मालिका आणि चित्रपट पोहोचविण्यासाठी एअरटेल सोबत भागीदारी केली आहे आणि त्यायोगे भारतभरातील प्रेक्षकांसाठी नव्याने शक्यता निश्चित करीत आहोत. या भागीदारीत प्रत्येकासाठी काहीतरी सादर केले जात असून ती पुरस्कार प्राप्त विषय, कथा आणि मनोरंजन सुलभपणे उपलब्ध करण्याच्या आमच्या धोरणात्मक ध्येयाशी सुसंगत आहे.”

या भागीदारीसह, ग्राहकांना सर्व ॲपल टीव्ही+ च्या मूळ मालिका आणि चित्रपट जाहिरात मुक्त पाहण्याचा आनंद उचलता येणार आहे आणि त्यात ‘टेड लासो’, ‘सेव्हरेन्स’, ‘द मॉर्निंग शो’, ‘स्लो हॉर्स’, ‘सायलो’ आणि ‘डिस्क्लेमर’ यांसारख्या जागतिक पुरस्कार विजेत्या हिट मालिका तसेच ‘वुल्फ्स’ आणि ‘द गॉर्ज’ यांसारखे ताजे चित्रपट सामील आहेत.
याशिवाय, ग्राहकांना पुरस्कार विजेते ॲपल म्युझिक 6 महिने विनामूल्य उपलब्ध असेल, जो भारतीय आणि जागतिक संगीताचा सर्वात मोठा संग्रह आहे, तज्ञरीतीने तयार केलेल्या प्लेलिस्ट, कलाकारांच्या मुलाखती, ॲपल म्युझिक रेडिओसोबत ॲपल म्युझिक सिंग आणि टाइम-सिंक केलेले लिरिक्स उपलब्ध होणार आहेत तसेच लॉसलेस ऑडिओ आणि तल्लीन करणाऱ्या स्पेशिअल ऑडिओ सारखी रोमांचक वैशिष्ट्ये उपलब्ध केले जाणार आहेत.
ॲपल टीव्ही+ आणि ॲपल म्युझिकची भर घालून ॲमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स, झी5 आणि जिओ हॉटस्टार सारख्या प्रमुख स्ट्रीमिंग कंपन्यांसह विद्यमान भागीदारी सोबत एअरटेल वायफाय ग्राहकांना चुटकीसरशी मनोरंजनाच्या पर्यायांचा अप्रतिम खजिना उपलब्ध करून देत आहे आणि म्हणून एअरटेलने(Airtel plan) आपल्या ग्राहकांना सकल व संपन्न डिजिटल जीवनशैली अनुभव प्रदान करण्यात अग्रगण्य म्हणून स्थान मजबूत केले आहे.
हेही वाचा :
महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, म्हणाले…
गिलला Attitude दाखवणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचा माज विराटने क्षणात उतरवला; भन्नाट Video
Jio नं लाँच केला 195 रुपयांचा नवीन प्लॅन, JioHotstar चे सब्सक्रिप्शन मोफत