‘पुष्पा २’ मुळे अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना सध्या चर्चेत आहे. देशभरात दोघंही सध्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अल्लू अर्जुनने आतापर्यंत चेन्नई, कोची आणि पटनासारख्या शहरात प्रमोशन केलं असून तो नुकताच मुंबईत ‘पुष्पा २ द रूल’चं प्रमोशन करण्यासाठी आला होता. मुंबईत येताच अल्लू अर्जुनने एका कार्यक्रमात चाहत्यांसोबत मराठीत संवाद साधून त्यांचं मन जिंकलंय. सुप्रसिद्ध तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुन मुंबईत आल्यानंतर मराठी बोलल्यानंतरचा व्हिडीओ(VIDEO) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अल्लू अर्जुनचा मराठी बोलत असतानाचा व्हिडिओ(VIDEO) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ ‘सिनेब्लूज’ने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केलेला आहे. ‘पुष्पा २ द रूल’चं प्रमोशन करण्यासाठी चित्रपटातील मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना मुंबईत चित्रपटाचं प्रमोशन करायला आला होता.
याच वेळी झालेल्या एका कार्यक्रमात अल्लू अर्जुनचं स्वागत करण्यात आलं. दरम्यान, व्यासपीठावर येताच अभिनेत्याने उपस्थितांशी मराठीत संवाद साधयला सुरूवात केला. मुंबईतल्या प्रमोशनदरम्यानच्या व्हायरल व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन स्टेजवर येतो तेव्हा निवेदक त्याचं स्वागत करतात. तुम्ही इथल्या लोकांशी काही तरी संवाद साधावा, अशी विनंती निवेदकाने अभिनेत्याकडे केली.
अल्लू अर्जुन स्टेजवर येताच हाती माईक घेतो आणि सर्वांना “नमस्कार” असं बोलून मान खाली करून अभिवादन करतो. उपस्थित लोक टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. त्यानंतर पुढे अल्लू अर्जुन “कसं काय मुंबईकर” असं म्हणतो. पुन्हा लोक टाळ्या वाजवतात. अल्लू अर्जुनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. त्याच्या मराठीने मुंबईकरांच्या मनावर राज्य केले आहे.
अल्लू अर्जुन काही पहिल्यांदाच यावेळी मराठीमध्ये बोललेला नाही. २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘पुष्पा द राईज’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळेही अभिनेत्याने मराठीमध्ये संवाद साधला होता. ‘पुष्पा द राईज’चित्रपटाला फक्त देशातच नाही तर परदेशातही जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने ३९० ते ३९४ कोटींपर्यंतची एकूण कमाई केली आहे.
अॅक्शन-ड्रामा असणाऱ्या ‘पुष्पा द रुल’चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार करच असून आणि पहिल्याही भागाचं दिग्दर्शन त्यांनीच केलं आहे. ‘पुष्पा द रुल’चित्रपट येत्या ५ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, बंगाली आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ॲडव्हान्स बुकिंग पाहता हा चित्रपट २०२४ मधील सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चित्रपटाने आतापर्यंत ओटीटी राईट्स, प्री बुकिंग आणि टेलिव्हिजन राईट्समधून चित्रपटाचं प्रदर्शन होण्याआधी जबरदस्त कमाई केलेली आहे.
हेही वाचा :
त्या “जीआर” चे गोड बंगाल ! सरकारने हात झटकले….!
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, सर्वांच्या भेटी रद्द
आयकर विभागाची मोठी कारवाई, डोळे फिरवणारी रोकड लागली हाताला