अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी(custody) सुनावण्यात आली आहे. नामपल्लीच्या सत्र न्यायालयाने ‘पुष्पा 2’ अभिनेत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, या प्रकरणी मृत महिलेचा पती भास्कर याने आपण खटला मागे घेणार असल्याचे सांगितले असले तरी, निकाल देताना न्यायालयाने अल्लू अर्जुनला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
संध्या थिएटरमध्ये एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनचा त्रास संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. शुक्रवारी दुपारी पोलिसांनी अभिनेत्याला त्याच्या घरातून अटक केली. यानंतर आता हैदराबाद कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी(custody) सुनावली आहे. या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण जाणून घेणार आहोत.
पोलिसांनी अल्लू अर्जुनला शुक्रवारी त्याच्या घरातून पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेले. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केल्याची बातमी समोर आली. पोलिसांनी अभिनेत्याला न्यायालयात हजर केले. जिथे न्यायालयाने अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा :
सरकारच्या ‘या’ भन्नाट योजनेचा लाभ घ्या, 3 लाखांचं कर्ज मिळवा
नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर 5.48 टक्क्यांवर, सर्वसामान्यांना दिलासा
एक चूक जीवावर बेतली! वर्गात चिमुकलीने गिळले पेनाचे टोपण अन् नको ते घडलं…