शुभमन गिलसह, वॉशिंग्टन सुंदरचे भारतीय संघात होणार पुनरागमन

शुभमन गिल दुखापतीतून सावरत पुन्हा एकदा भारतीय संघात(Indian team) खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आम्ही मागील सामन्यात जरी पराभूत झालो असलो तरी या सामन्यात जोरदार पुनरागमन करीत पुन्हा बाऊन्सबॅक करू, असा विश्वास भारतीय संघाचे कोच रियान टेन यांनी व्यक्त केला.

दरम्यान, भारतीय संघाचे(Indian team) अस्टिटंट कोच यांनी स्पष्ट केले की, ते आणखी एक गोलंदाजाला या टीममध्ये फिट करू इच्छितात, त्यामुळे एक फलंदाज नक्कीच बाहेर राहील यामध्ये सरफराज खान आणि केएल राहुल यांच्यात एकाला कोणाला तरी संघाबाहेर ठेवावे लागणार आहे. आता पिच पाहिल्यानंतरच यावर निर्णय होईल यामध्ये वाॅशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा इरादा आहे. असे मत रियान टेन डोयशे यांनी व्यक्त केले.

भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन ड्यूश यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुल आणि सरफराज खान यांच्यात रस्सीखेच होणार असल्याचे सांगितले. जरी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कर्नाटकच्या फलंदाजाला भरपूर संधी देण्यास उत्सुक आहेत.

बंगळुरू येथील पहिल्या कसोटीत आठ गडी राखून पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताने बाउन्स बॅक करण्याचा निर्धार केला आहे. आता वॉशिंग्टन सुंदरचाही संघात समावेश झाल्याने सर्वांचे लक्ष संघ संयोजनाकडे असेल. शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांना गुरुवारपासून सुरू होणाऱ्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त झाले आहेत.

दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंडचा कसोटी सामना पुण्याच्या गहुंजे स्डेडियवर खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना पुण्याच्या गहुंजे स्टेडियवर खेळला जाणार आहे. काल संध्याकाळी भारतीय संघाचे पुण्यात आगमन झाले. त्यानंतर आज न्यूझीलंडच्या संघाने सकाळी 9.30 वाजल्यापासून सरावाला सुरुवात केली. तर भारतीय संघाने 1.30 वाजता सरावाला सुरुवात केली.

दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने खेळपट्टीची पाहणी करीत टीम इंडियाने सरावदेखील केला. टीम इंडियाचा मागील सामन्यात न्यूझीलंडकडून 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय कर्णधार रोहित शर्माने याबद्दल खेद व्यक्त केला होता. पहिल्या सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये 46 धावांवर संपूर्ण संघ बाद झाला होता. त्यानंतर न्यूझीलंडने त्याच पिचवर मोठी खेळी केली होती. यानंतर लगेच रोहित शर्माने प्रेस घेत आपण खेळपट्टीचा अंदाज घेण्यात चुकल्याची कबुली दिली होती.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात 4 दिवसांचा खेळ पूर्ण झाला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ अतिशय रोमांचक झाला. जवळपास दोन सत्रांपर्यंत टीम इंडियाचा दबदबा दिसून आला. मात्र, दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी संघाला दमदार पुनरागमन करायला लावले. आता खेळाच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी फक्त 107 धावांचे लक्ष्य गाठायचे आहे. एकेकाळी असे वाटत होतं की, टीम इंडिया मोठा टोल लावण्यात यशस्वी होईल, पण नंतर असं काही घडलं ज्यामुळे संपूर्ण खेळच बदलून गेला.

सर्फराज खान आणि ऋषभ पंत यांनी टीम इंडियाच्या दिवसाची सुरुवात केली. या दोन्ही खेळाडूंची अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली. 231 धावांनी दिवसाची सुरुवात करीत या दोन खेळाडूंनी संघाची धावसंख्या 400 धावांच्या पुढे नेली. मात्र यानंतर टीम इंडियाने एकामागून एक सर्व विकेट्स गमावल्या. भारतीय संघाला चौथा धक्का सरफराज खानच्या रूपाने बसला, तेव्हा संघाची धावसंख्या ४०८ धावांवर होती. यानंतर भारतीय संघ केवळ 54 धावाच करू शकला आणि 462 धावांवर सर्वबाद झाला.

वास्तविक, टीम इंडियाच्या(Indian team) डावातील 80 षटके पूर्ण झाल्यानंतर, न्यूझीलंडला एक नवीन बाउल देण्यात आला, जो कसोटी क्रिकेटचा नियम आहे. चेंडू बदलल्यानंतरच सामन्यात सर्व काही बदलले. भारतीय फलंदाजांना नवीन चेंडू चांगला खेळता आला नाही. न्यूझीलंडला नवा चेंडू मिळाला तेव्हा टीम इंडियाने 400 धावा केल्या होत्या आणि फक्त 3 विकेट गमावल्या होत्या. पण, यानंतर टीम इंडियाला नव्या चेंडूवर केवळ 62 धावा करता आल्या. त्यामुळे भारताचा दुसरा डाव 462 धावांवरच मर्यादित राहिला आणि न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे लक्ष्य मिळाले.

सर्फराज अहमदने या डावात 150 धावा केल्या, जे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक होते. त्याचवेळी पंत ९९ धावांची खेळी खेळून बाद झाला. 90 किंवा त्याहून अधिक धावा केल्यानंतर पंतचे शतक हुकण्याची ही 7वी वेळ होती. यादरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये चौथ्या विकेटसाठी १७७ धावांची भागीदारीही झाली. आता न्यूझीलंड 36 वर्षात प्रथमच भारतात कसोटी सामना जिंकण्याच्या जवळ पोहोचला आहे. न्यूझीलंडने भारतातील शेवटचा कसोटी सामना १९८९ मध्ये मुंबईत जिंकला होता. त्यानंतर सर रिचर्ड हॅडलीने 10 विकेट घेत संघाला 136 धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

हेही वाचा:

भाजपला धक्क्यांवर धक्के; माजी आमदारांनी सोडली साथ

शरद पवारांचा शिंदे गटाला धक्का, ‘या’ नेत्याने तुतारी फुंकली

लॉरेन्स बिष्णोईंच्या धमक्यांनंतरही सलमान मैदानात! ‘सिंघम अगेन’मधील कॅमिओ करणार शूट