व्हॉट्सॲपचे आश्चर्यकारक फिचर! आता कोणीही ऐकू नाही शकणार तुमचा Voice Message

व्हॉट्सॲपचे जगभरात लाखो दैनंदिन ऍक्टिव्ह युजर्स आहेत. मेटा त्याच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर सतत नवनवीन फीचर्स आणत असते. त्यातच आता नुकतेच व्हॉट्सॲपमध्ये एक अप्रतिम नवीन फीचर ॲड करण्यात आला आहे. या नवीन फिचरनुसार आता यूजर्सना व्हॉइस मेसेज (Voice Message)ओपन गरज भासणार नाही. या फीचरसाठी व्हॉट्सॲप बरेच दिवस काम करत होते. व्हॉट्सॲपचे हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही युजर्ससाठी आणण्यात आले आहे. या फीचरचा फायदा अशा यूजर्सना होईल ज्यांना व्हॉईस मेसेज ओपन करायचे नाहीत.

व्हॉट्सॲपने आपल्या ब्लॉग पोस्टद्वारे या फीचरची माहिती दिली आहे. व्हॉट्सॲपच्या ब्लॉग पोस्टनुसार, याला व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्ट फीचर असे नाव देण्यात आले आहे. व्हॉट्सॲपच्या या फीचरद्वारे यूजर्स इनकमिंग व्हॉइस मेसेजचे ट्रान्सक्रिप्ट वाचू शकतात. कंपनीने दावा केला आहे की, ते पूर्णपणे सुरक्षित असेल आणि ऑन-डिव्हाइस ट्रान्सक्रिप्ट तयार करेल. यानुसार युजरचा मेसेज ऑन डिव्हाइस ट्रान्सक्रिप्ट होईल ज्यामुळे हे एंड-टू-एंड ट्रांसक्रिप्टेड राहील.

व्हॉट्सॲपचे जगभरात लाखो दैनंदिन ऍक्टिव्ह युजर्स आहेत. मेटा त्याच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर सतत नवनवीन फीचर्स आणत असते. त्यातच आता नुकतेच व्हॉट्सॲपमध्ये एक अप्रतिम नवीन फीचर ॲड करण्यात आला आहे. या नवीन फिचरनुसार आता यूजर्सना व्हॉइस मेसेज ओपन गरज भासणार नाही. या फीचरसाठी व्हॉट्सॲप बरेच दिवस काम करत होते. व्हॉट्सॲपचे हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही युजर्ससाठी आणण्यात आले आहे. या फीचरचा फायदा अशा यूजर्सना होईल ज्यांना व्हॉईस मेसेज(Voice Message) ओपन करायचे नाहीत.

व्हॉट्सॲपने आपल्या ब्लॉग पोस्टद्वारे या फीचरची माहिती दिली आहे. व्हॉट्सॲपच्या ब्लॉग पोस्टनुसार, याला व्हॉईस मेसेज ट्रान्सक्रिप्ट फीचर असे नाव देण्यात आले आहे. व्हॉट्सॲपच्या या फीचरद्वारे यूजर्स इनकमिंग व्हॉइस मेसेजचे ट्रान्सक्रिप्ट वाचू शकतात. कंपनीने दावा केला आहे की, ते पूर्णपणे सुरक्षित असेल आणि ऑन-डिव्हाइस ट्रान्सक्रिप्ट तयार करेल. यानुसार युजरचा मेसेज ऑन डिव्हाइस ट्रान्सक्रिप्ट होईल ज्यामुळे हे एंड-टू-एंड ट्रांसक्रिप्टेड राहील.

मात्र, हे फीचर वापरण्यासाठी युजर्सना हे फिचर प्रथम चालू करावे लागेल. ते चालू केल्यानंतर, तुम्हाला इनकमिंग व्हॉइस मेसेजच्या खाली ट्रान्सक्रिप्शनचा एक पर्याय दिसू लागेल. हे ट्रांसक्रिप्ट केवळ रिसिव्हर पाहण्यास सक्षम असेल. पाठवणाऱ्याला ट्रान्सक्रिप्शन दिसणार नाही. सध्या हे फिचर इंग्रजी, पोर्तुगीज, स्पॅनिश आणि रशियन भाषांना सपोर्ट करेल. iOS युजर्ससाठी , ते अरबी, चीनी, फ्रेंच, जर्मन, इटालियन, जपानी, नॉर्वेजियन, थाई, तुर्की आणि स्वीडिश भाषांना देखील समर्थन देईल.

असे इनॅबल करा Voice Transcript

  • यासाठी सर्वप्रथम WhatsApp चे नवीनतम अपडेट डाउनलोड करा
  • ॲप उघडा आणि सेटिंग्ज वर जा
  • येथे चॅट्स पर्यायावर टॅप करा आणि व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्ट्ससाठी टॉगलवर टॅप करा आणि तुमच्या आवडीची भाषा निवडा
  • यानंतर, कोणत्याही व्हॉइस मेसेजवर टॅप करा आणि धरून ठेवा आणि ट्रान्सक्रिप्शन सुरू होईल

व्हॉट्सॲपचे म्हणणे आहे की, ट्रान्सक्रिप्शन सुरू होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. युजरला ट्रान्सक्रिप्शन उपलब्ध नसल्याचा एरर मेसेज मिळाल्यास, याचा अर्थ त्या भाषेचे ट्रान्सक्रिप्शन सध्या उपलब्ध नाही किंवा व्हॉइस मेसेजच्या भाषेला सपोर्ट करत नाही. कंपनी लवकरच इतर भाषांसाठी देखील समर्थन जारी करू शकते.

हेही वाचा :

घसणीनंतर सोन्याला पुन्हा झळाळी, चांदीच्या दरात घसरण

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात

लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं?, गारगार वाटायचं; नार्वेकरांचं अभिनंदन, अजित पवारांची टोलेबाजी