अंबाबाईच दर्शन घेणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : वारणा उद्योग समूहाच्या विशेष कार्यक्रमास(president) उपस्थित राहण्यासाठी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. करवीर निवासिनी आदिशक्ती अंबाबाईच दर्शन घेणाऱ्या त्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या त्या पाचव्या राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यानिमित्त कोल्हापूर शहरात अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांच्या दौऱ्या वेळी पोलीस बंदोबस्त(president) कशा प्रकारचा असावा याचे मार्गदर्शन करणारी नील पुस्तिका आहे. ब्ल्यू बुक ॲक्ट असेही त्याला म्हणतात. नीलपुस्तिकेतील मार्गदर्शनाप्रमाणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्या ज्या रस्त्याने करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिराकडे जाणार होत्या तो मार्ग प्रत्यक्ष राष्ट्रपतींचा वाहन ताफा येण्याआधी निर्मनुष्य करण्यात आला होता. करवीर वासियांना एका विशिष्ट सुरक्षित अंतरावर रोखून धरण्यात आले होते.

राष्ट्रपतींना पाहण्यासाठी लोकांनी चौका चौकात प्रचंड गर्दी केली होती. इसवी सन 1969 मध्ये भारताचे राष्ट्रपती व्ही व्ही गिरी हे कोल्हापूरला आले होते. सध्याच्या शाहू स्टेडियमवर त्यांची जाहीर सभा झाली होती. राष्ट्रपतींच्या इंग्रजी भाषणाचे प्राचार्य एम आर देसाई यांनी मराठीमध्ये तेव्हा भाषांतर केले होते.

डॉक्टर शंकर दयाळ शर्मा हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी आदिशक्ती करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले होते. के आर नारायणन हे सुद्धा कोल्हापूरला आले होते. कोल्हापुरातील एका चर्मकार कारागिराने त्यांच्यासाठी खास कोल्हापुरी चप्पल बनवली होती. त्या कारागिराकडून कोल्हापुरी चप्पल स्वीकारण्यापूर्वी”ही चप्पल बनवण्यासाठी नैसर्गिकरीत्या मृत झालेल्या जनावराचे कातडे वापरले आहे”अशी शपथ भगवत गीतेवर हात ठेवून त्या कारागिराने घेतल्यानंतर हे कोल्हापुरी चप्पल राष्ट्रपतींनी स्वीकारले होते.

मिसाईल मॅन अशी जगभर ओळख असलेले राष्ट्रपती डॉक्टर एपीजे कलाम हे वारणा उद्योग समूहाच्या एका कार्यक्रमासाठी कोल्हापूरला आले होते. प्रतिभाताई पाटील ह्या राष्ट्रपती असताना त्यांना कोल्हापूर अर्बन सहकारी बँकेच्या शताब्दी महोत्सवासाठी खास निमंत्रण देण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणामुळे त्या कोल्हापूरला येऊ शकल्या नाहीत. मात्र राज्यसभेच्या उपाध्यक्ष असताना त्या पन्हाळा येथे शिक्षक संघाच्या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी आलेल्या होत्या.

द्रौपदी मुर्मू ह्या कोल्हापूरला आलेल्या पाचव्या राष्ट्रपती (president)आहेत. त्यांना जवळून पाहण्याची करवीर वासियांना इच्छा होती मात्र पोलीस बंदोबस्तामुळे ते शक्य झाले नाही. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी त्या येणार असल्यामुळे अंबाबाई मंदिरात सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत भाविकांना तसेच पर्यटकांना प्रतिबंध करण्यात आला होता.

राष्ट्रपतींचा ताफा ज्या मार्गावरून जाणार होता त्या मार्गावर भटकी कुत्री येऊ नयेत याची खबरदारी म्हणून भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी कोल्हापूर महापालिकेचे खास पथक तसेच मिरज येथून भटकी कुत्री पकडणाऱ्यांना खास प्रचारण करण्यात आले होते. अंबाबाई मंदिर परिसरातील संत गाडगेबाबा महाराज चौकात डॉग स्कॉडने दोन कुत्री पकडली. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या निमित्ताने अंबाबाई मंदिर आणि आसपासच्या परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य करण्यात आल्यामुळे अनेकांना लॉक डाऊन ची आठवण आली.

हेही वाचा:

धक्कादायक! काँग्रेस नेत्याने कुटुंबासह आयुष्य संपवलं

इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला वीज सवलत, आमदार प्रकाश आवाडे यांचा महत्वाकांक्षी विजय

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नितेश कुमारच्या ऐतिहासिक सुवर्णपदकासह भारताची चमक