‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरु करण्याचे अमित शाह यांचे षडयंत्र’; संजय राऊतांचा घणाघात

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा(political news) निवडणुकीची वारे वाहत आहे. आयोगाकडून तारीख जाहीर झाल्यानंतर जोरदार तयारी आणि जागावाटपाची बोलणी सुरु झाली आहे. निवडणूकीमध्ये अवघा एक महिना शिल्लक राहिलेला असताना राज्याचे राजकारण जोरदार रंगले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील टीका केली असून महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महायुतीवर(political news) त्यांनी जोरदार टीका केली. खासदार राऊत म्हणाले की, २४ ते २६ नोव्हेंबर असा ४८ तासांचा वेळ नवीन सरकार बनविण्यासाठी मिळणार आहे. पण हा वेळ पुरेसा नाही. ४८ तासांत सरकार स्थापन करून शपथविधी करावा लागेल. या काळात दोन्ही आघाड्यांना आपापल्या आमदारांना एकत्र करत बहुमत दाखवावे लागेल.

आमदारांच्या बैठका घेऊन नेतानिवडीचे सोपस्कार पार पाडावे लागतील. निकालानंतरच्या ४८ तासांत घडले नाही, तर विधानसभेचा कालावधी संपणार आणि नवी विधानसभा अस्तित्वात आली नाही म्हणून राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची शिफारस राज्यपाल करतील, अशी मांडणी असल्याचे संजय राऊत यांनी मांडली.

तसेच पुढे त्यांनी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अमित शाह यांचा प्रयत्न असणार आहे, असा घणाघात संजय राऊतांनी केला. राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात घाईघाईने निवडणुका घेऊन भाजपा आपले मनसुबे पूर्ण करीत आहे. अमित शहा व महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना आपण महाराष्ट्र गमावू याविषयी खात्री पटली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी जिंकली तरी त्यांना सरकार स्थापनेस पुरेसा वेळ मिळू नये. त्यानंतर सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती शासन लावून राज्य करायचे असा एकंदरीत डाव दिसतो आहे”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच भाजपकडून प्रत्येक मतदारसंघातील नावं काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो आहे. असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. राऊत म्हणाले, “मतदारसंघातून दहा हजार नावं काढून तिथे बोगस नावं टाकायचं काम भाजप करत आहे. अमित शाह हे महाराष्ट्राचे एक नंबर शत्रू आहेत. बावनकुळे या षडयंत्राचे सूत्रधार आहेत. लोकशाहीची हत्या केली जाते,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा:

दिवाळीपूर्वी वजन कमी करायचंय? मग रोज ‘या’ ड्रिंकचं सेवन करा

मजुरासोबत रस्त्यावर झोपला अभिनेता, व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून ट्रोल

बाबा सिद्धीकीनंतर लॉरेन्स बिश्नोईचे पुढचे टार्गेट राहूल गांधी…; अभिनेत्याचे वादग्रस्त विधान