केंद्रीय गृहमंत्री (Political news)अमित शाह यांनी केलेल्या टीकेला आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं. हे गृहस्थ ज्यावेळी गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, त्यावेळी सहकार्यासाठी ते बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आले होते असे म्हणत शरद पवार यांनी अमित शाह यांना टोला लगावला. याबाबत अधिकची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे देतील असंही शरद पवार म्हणाले.

राजकारणाची (Political news)पातळी घसरली आहे. अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याची भाजपमध्ये देखील किती नोंद घेतील? असेही पवार म्हणाले. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे अनेक वर्ष देशाचे गृहमंत्री होते.
त्यांनी चांगल कामं केल्याचे शरद पवार म्हणाले. गृहमंत्री अमित शाह यांनी माझ्यावर टीका केली. पण त्यांनी थोडी माहिती घेऊन टीका केली तर बरं होईल असे शरद पवार म्हणाले.
इंडीया अलायन्स म्हनून आम्ही राष्ट्रीय पातळींवर एकत्रीत लढावे हे ठरले होते. त्यात यश आल्यावर आम्ही राज्यात एकत्र लढलो. पण पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकी एकत्र लढाव्या याबाबत कोणतीच चर्चा झाली नव्हती, असेही शरद पवार म्हणाले.
पण राज्यापुरते बोलायचे झाले तर राज्य पातळींवर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रीतरित्या 8 ते 10 दिवसात बैठक घेऊ असे शरद पवार म्हणाले.
पक्षांतर्गत बदल करण्यात येणार आहेत. पुढील 10 ते 12 दिवसांत हे बदल होतील असे शरद पवार म्हणाले. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आरोग्याच्या संदर्भात ट्रिटमेंटसाठी बाहेर आहेत. ते आले की आम्ही याबाबतची घोषणा करु असेही शरद पवार म्हणाले. आम्ही भाजपसोबत कोणतीही कमिटमेंट केली नव्हती असेही शरद पवार म्हणाले.
दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांना मदत केली पाहिजे अशी आमच्या पक्षात भावना आहे. काँग्रेससोबत देखील बोलण्याचा प्रयत्न करु असेही शरद पवार म्हणाले.

मी RSS च्या विचारधारेचं अजिबात समर्थन करत नाही, पण त्यांच्याकडे मेहनत करणारं केडर आहे, ते दुर्लक्षित करु शकत नाही असेही शरद पवार म्हणाले. स्वातंत्र्य लढ्यात RSS चे योगदान काय? असा सवालही पवारांनी केला. आरएसएस स्वतःचा नवा इतिहास लिहित आहे असेही पवार म्हणाले.
हेही वाचा :
महाकुंभमध्ये बाबांचा राग अनावर: युट्युबरची धुलाई पाहून तुम्हालाही येईल हसू, Video Viral
धक्कादायक ! नोकरीच्या आमिषाने महिलेला एका खोलीत नेलं, वारंवार अत्याचार केले अन् …
विधानसभेला उभं राहणार नाही” शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची मोठी घोषणा!