राज्याच्या राजकारणात(political) हलचाल आणणारे वक्तव्य करत, खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्ला केला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिवस्वराज्य यात्रेदरम्यान, कोल्हे यांनी सूचक इशारा देत म्हटलं, “झाड मूळं सोडतं तसं नेता शरद पवारांचं बोट सोडताच पडतो.”
अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यातून त्यांनी स्पष्टपणे अजित पवार गटाला उद्देशून हे विधान केले आहे. त्यांनी हेही नमूद केले की, शरद पवारांनी महाराष्ट्राच्या हितासाठी निवडणुकांमधून कधीही मागे हटले नाही, तर काही जण स्वार्थासाठी विभाजनाचा निर्णय घेतात. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि वसमतचा आमदारही सत्ताधारी असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे वक्तव्य राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेला कारणीभूत ठरले आहे, ज्यामुळे पुढील निवडणुकीच्या तयारीमध्ये नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा :
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त
आईच्या मद्याच्या आहारी गेलेल्या क्षणात, १३ वर्षीय मुलीवर पित्याचा अत्याचार
बकरी विक्रीच्या रागात मुलाने आईला पेटवले