केंद्रीय अर्थसंकल्पातून अनेकांची निराशा झाली असली तरी काही कंपन्या मात्र मालामाल(Tata) झाल्या आहेत. अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 6 टक्के करण्यात आले आहे. तसेच, प्लॅटिनमवरील शुल्कही 6.4 टक्के करण्यात आले आहे.
ज्याचा थेट परिणाम या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये(Tata) मोठी वाढ दिसून आली आहे. यामध्ये रतन टाटा यांची प्रीमियम कंपनी टायटन हिचा शेअर तब्बल 7 टक्क्यांनी वधारला आहे. तर अन्य कंपन्या सेन्को गोल्ड लिमिटेड, पीसी ज्वेलर्स लिमिटेड, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील मोठी वाढ दिसून आली आहे.
अर्थसंकल्प सादर होताच मंगळवारी टायटन कंपनीचा शेअर 3490 रुपयांपर्यंत वधारला आहे. मात्र त्यानंतर तो 3468 रुपयांवर बंद झाला आहे. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सेन्को गोल्डच्या शेअर्समध्येही वाढ दिसून आली. हा शेअर 948.80 वर खुला झाला. तर त्यानंतर तो 1054.35 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आणि तर बाजार बंद होतेवेळी 987.55 रुपयांवर बंद झाला. अर्थात रतन टाटा यांना मोठा फायदा झाला आहे. तर गुंतवणूकदार देखील टायटनच्या शेअरमधून मालामाल झाले आहेत.
विशेष म्हणजे निफ्टीच्या 50 शेअरमध्ये गोल्ड ज्वेलरी संबंधित ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. त्यात टायटन पहिल्या क्रमांकावर आहे. टायटनच्या शेअरमध्ये आलेल्या तेजीने कंपनी कंपनीचे मुल्य जवळपास 19000 कोटी रुपयांनी वाढले आहे. तर टायटनमध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार देखील मालामाल झाले आहे. टायटन कंपनीच्या शेअरमध्ये आलेल्या तेजीनंतर, ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, हा शेअर 215.55 (6.63 टक्के) च्या वाढीसह 3468.15 रुपयांवर बंद झाला. आगामी काळात सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये आणखी तेजीची शक्यता आहे.
हेही वाचा :
आज ‘या’ 5 राशींचं नशीब पालटणार, इच्छित गोष्टी साध्य होणार
“महाराष्ट्रातील सरकार शेठजी-भटजींचे..”,श्याम मानव यांचे टीकास्त्र
ऑलिम्पिक तिरंदाजी स्पर्धा: पदकाची आशा घेऊन सहा भारतीयांचा सहभाग