कल्याण : कल्याणमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. आता कल्याणमधील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका डॉक्टरांकडून(doctor) एका नवजात बाळाला विकण्याचे प्रयत्न करण्यात आला आहे. एवढेच नाही तर बाळाच्या आईचे दूध बंद होण्यासाठी अंध आईला गोळ्या देखील देण्यात आल्या होत्या. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी डॉक्टर अनुदुर्ग विरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे.
मोहने परिसरात एक अंध दांपत्य राहत आहे. या दांपत्याला एक पाच वर्षाची मुलगी आणि एक तीन वर्षाचा मुलगा आहे. पाच महिन्यानंतर महिलेला समजले की, ती गर्भवती आहे. दोघे पती-पत्नी कल्याण पश्चिम येथील मोहने येथील गणपती नर्सिंग होममध्ये गेले.
मोहने परिसरातील असलेल्या गणपती नर्सिंग होम मधील डॉक्टरांनी(doctor) महिलेचा चेकअप करून सांगितले की, ती गर्भवती आहे. या दांपत्यांना तिसरे मूल नको होते म्हणून त्यांनी गर्भपात करण्याबाबत प्रक्रिया करायला डॉक्टरला सांगितले. मात्र डॉक्टर अनुदुर्ग धोनी यांनी सांगितले की, हे बाळ त्यांना देण्यान यावे.
डॉक्टर म्हणाले की, बाळ तो आपल्या एका नातेवाईकाला देणार, डॉक्टरांचा नातेवाईक या बाळाच्या देवाणघेवाणीमध्ये हॉस्पिटलचे सर्व खर्च आणि दांपत्याचे दोन मुलांचे शिक्षणाचा खर्च देखील उचलणार असं अंध दांपत्याना सांगितलं. अंध दाम्पत्यांना वाटले की कमीत कमी या बाळामुळे आपल्या दोन मुलांचे शिक्षण तरी चांगले होईल या लालसेपोटी दोघे तयार झाले.
२४ ऑगस्ट रोजी महिलेला एक बाळ झालं, डॉक्टरने हे बाळ आपल्या ताब्यात घेतले. नंतर जेव्हा अंध दांपत्याने या डॉक्टरला विचारले की, तुम्ही आम्हाला काही आश्वासन दिले होते. याबाबत डॉक्टर धोनी यांनी स्पष्ट नकार दिला. एवढेच नाही तर हॉस्पिटलचे बिल भरायला सांगितले. जवळपास आठ ते दहा दिवस डॉक्टरने या बाळाला आपल्या ताब्यात ठेवले आईच्या दूध बंद करण्यासाठी त्यांनी काही गोळ्या पण दिल्या.
मात्र एका सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठपुराव्यानंतर डॉक्टराला ते बाळ आई-वडिलांना परत करावं लागलं. या प्रकरणात कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी चाइल्ड वेल्फेअर समितीच्या एका अधिकाऱ्याच्या तक्रारीवर डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले की, याप्रकरणी डॉक्टरांनी जे कृत्य केले त्यानंतर आम्ही ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात डॉक्टर विरोधात कठोर कारवाई केली जाईल. याबाबत डॉक्टर अनुदुर्ग धोनी यांचे म्हणणे आहे की, त्यानी त्याचावर लावण्यात आलेले आरोप सर्व खोटे आहेत.
हेही वाचा:
सळसळणारा उत्साह आणि रस्त्यावर उतरलेला जनसागर
BSNL सुपर रिचार्ज! दररोज 3 रुपये पेक्षाही कमी खर्चात 10 महिन्यांचा रिचार्ज
घड्याळ काढणार, तुतारी धरणार; अजितदादांना होमपिचवरच धक्का