फटाक्यांनी भरलेल्या दुकानात स्फोट; घटनेचा थरराक व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ (video)आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा हास्यास्पद गोष्टी समोर येतात. तसेच सत्य घटनांचे व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका फटाक्यांच्या दुकानात भीषण आग लागल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ(video) हैद्राबादमधील असल्याचे सांगितले जात आहे. दिवाळीपूर्वी हैदराबादच्या सुलतान बाजार परिसरात फटाक्यांच्या दुकानाला आग लागल्याची माहिती आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फटाक्यांच्या दुकानात मोठी गर्दी दिसत आहे, आणि अचानक आग लागल्याने फटाके एकामागून एक फुटू लागले. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले आणि संपूर्ण दुकान आगीत जळून खाक झाले.

तसेच घटनास्थळी झालेल्या आगीत एका रेस्टॉरंटसह 7-9 गाड्या देखील जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. सुलतान बाजार परिसरातील पारस फटाके नावाचे हे दुकान अवैध असल्याचे सांगण्यात येत आहे. दुकानाला अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली होती. आग लागल्यानंतर लोकांनी स्वतःला वाचवण्यासाठी धावाधाव सुरू केली. यामुळे बाहेर चेंगराचेंगरीचे दृश्यही पाहायला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावर तात्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि रात्री 10.30-10.45 च्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे, मात्र सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीमुळे एक रेस्टॉरंट पूर्णपणे जळून खाक झाले आहे आणि 7-8 गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अवैध फटाक्यांच्या दुकानाविरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तथापि, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर purvanchal51 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. एका युजरने यावर प्रतिक्रीया देत म्हटले आहे की खरतर फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे म्हणजे असे कधीच घडणार नाही. अनेकांनी त्याच्या मताला समर्थन दिले आहे.

हेही वाचा :

टीम इंडियाचा हेड कोच बदलला, ‘या’ माजी क्रिकेटरवर सोपवली जबाबदारी

स्विस कंपन्या भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार; 10 लाख लोकांना मिळणार रोजगार!

भाजप एकनाथ शिंदेंचा गेम करणार?; शिंदेंना बसू शकतो मोठा धक्का