मराठा आरक्षणासाठी २७ वर्षांच्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा(reservation) मुद्दा चांगलाच गाजत आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी तरुणाने आपले जीवन संपवले. परभणीच्या जिंतूर तालुक्यात ही घटना घडली आहे.

जिंतूर तालुक्यात मराठा आरक्षणासाठी(reservation) पाचवा बळी आहे. या तरुणाने आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहून टोकाचे पाऊल उचलले. शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे परभणीमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथील २७ वर्षीय किशोर ससे या तरुणाने सुसाइड नोट लिहून मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या केली. शेतातील झाडाला गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली. सोमवारी रात्री साडेआठ वाजता ही घटना उघडकीस आली. जिंतूर तालुक्यातील हा पाचवा बळी आहे.

किशोर ससे हा गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग घेत होता. विशेष करून जिंतूर तालुक्यातील मराठा आरक्षण आंदोलनात पाचेगाव अग्रस्थानी आहे. अशातच १६ सप्टेंबरपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसत असल्यामुळे किशोर ससे हा विवंचनेत होता आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले.

किशोरने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नातेवाईकांना समजताच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन झाडाला लटकलेल्या अवस्थेतेतील किशोरला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तपासून किशोरला मृत घोषीत केले.

दरम्यान किशोर ससेने आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहिली. ‘एक मराठा कोटी मराठा, मी मनोज जरांगे’, असे या सुसाइड नोटवर त्याने लिहले होते. या घटनेची नोंद जिंतूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. किशोरच्या पश्चात पत्नी, दोन मुले,आई,वडील,दोन भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा:

मला मुख्यमंत्री व्हायचंय…; अजित पवारांच्या मनातील गोष्ट आली ओठावर

अंध दांपत्याच्या नवजात बाळाला डॉक्टरांकडून विकण्याचा प्रयत्न

सलमान खान येणार आहे भविष्य पाहण्यासाठी बिग बॉसच्या नव्या सीझनमध्ये, प्रोमो प्रदर्शित