केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये शिक्षणासंबंधी महत्वाचा करार!

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारचा उतकृष्टता केंद्र उभारण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय(education) तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स व अन्य आधुनिक तंत्रज्ञानासाठी मिळणार चालना मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील स्वायत्त वैज्ञानिक संस्था असलेल्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण(education) मंडळ यांच्यात केंद्राच्या उत्कृष्टता केंद्र उभारण्याकरिता सामंजस्य करार झाला आहे.

या अंतर्गत राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतन यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, इंडस्ट्री 4.0, 3D प्रिंटिंग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि संशोधनासाठी निधी उपलब्ध होणार आहे.

नवी दिल्ली येथील रेल्वे भवन येथे आज दि. 11 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या बैठक झाली. त्यामध्ये राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये व शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार झाला. या करारामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, इंडस्ट्री 4.0, 3D प्रिंटिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांसाठी राज्यात प्रशिक्षण आणि संशोधन केंद्रे उभारली जाणार आहेत.

या करारावेळी रेल्वे, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. तांत्रिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, आणि NIELIT चे महानिर्देशक डॉ. मदन मोहन त्रिपाठी, अभिषेक सिंग,अतिरिक्त सचिव आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता.

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार राहील. NIELIT शिक्षक व विद्यार्थ्यांना उद्योगांसोबत प्रशिक्षण कार्यक्रम, क्रेडिट कोर्सेस, आणि प्लेसमेंट सहाय्यता यांसारख्या सुविधा पुरवल्या जातील. या केंद्रांद्वारे विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधींमध्येही वाढ होईल.

या प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी सदर उपक्रमाचा शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनाकरीता सेंटर फॉर एक्सलन्स ही संकल्पना कार्यान्वित करणे हा मुख्य उद्देश आहे. सदर सेंटर मार्फत येणार अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शी सुसंगत असल्याचे सांगितले.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्र राज्याला औद्योगिक वारसा लाभलेला असून अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना सर्वागिण विकासाकरीता केंद्र सरकारच्या सहाय्याने सदर उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम राज्यआहे. महाराष्ट्र राज्यामध्ये यशस्वीरित्या अंमलबजावणी करुन पुढे देशभरात सदर उपक्रम राबविण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

राज्यातील 40 शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये यापूर्वीच 6 तंत्रनिकेतनांमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), क्षेत्रातील उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे, तर 3 तंत्रनिकेतनांमध्ये रोबोटिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रात उत्कृष्टता केंद्रे कार्यरत केले आहेत. उर्वरित तंत्रनिकेतनांमध्येही उत्कृष्टता केंद्रे उभारण्याची शासनाची योजना आहे, जी या कराराच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यावर पूर्ण केली जाणार आहे.

हेही वाचा:

मोठी बातमी! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून बालाजी मंदिर हटवले

महिलांना पार्ट टाइम जॉब, 11 हजार पगार देणार; महायुती सरकारची मोठी घोषणा

दसऱ्याचा दिवस 3 राशींसाठी ठरणार सोन्याचा; 12 ऑक्टोबरपासून उजळणार नशीब