‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज अश्रूंचा महापूर येणार आहे. (housemate)भावनांच्या खेळात भावशून्य झालेले सर्व सदस्य घरच्यांसोबत फोनवर बोलताना भावनिक झालेलं पाहायला मिळणार आहे.‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमी हंगामा करणारे सदस्य भावूक झाल्याचे दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कधी कोण कोणाचा मित्र होईल आणि कोण कधी कोणाचा दुश्मन होईल हे सांगणं कठिण आहे. त्यामुळे सदस्यांना आपल्या कुटुंबियांची आठवण येणं स्वाभाविक आहे.
‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळत आहे. घरच्यांना फोन लावताच सदस्य ढसाढसा रडताना दिसून येत आहेत. प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ म्हणत आहेत, “सदस्यांनी साधला जीवलंगासोबत आपुलकीचा संवाद”. बिग बॉस मराठी’चा आजचा भाग पाहताना ‘बिग बॉस’ प्रेमींना देखील अश्रू अनावर होणार आहेत. नेहमी एकमेकांसोबत (housemate)भिडणारे सदस्य आजच्या भागात आपल्या माणसांकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसणार आहेत.
‘बिग बॉस मराठी’चा आजच्या एपिसोडचा पहिला प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोने सर्वांनाच थक्क केलं आहे. सूरज चव्हाणचा गोलीगत पॅटर्न या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये “माझं मी बघेन”, म्हणत निक्की, अरबाज आणि जान्हवी या तगड्या सदस्यांसोबत सूरज चांगलाच भिडताना दिसत आहे.
सूरज चव्हाण आता आपले खरे रंग दाखवताना दिसत आहे. सुरुवातीपासूनच त्याला चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा आहे. चेहऱ्यावर हसू ठेवणाऱ्या सूरजच्या वैयक्तिक आयुष्यात बरंच काही घडून गेलंय. बिग बॉस मराठीच्या घरात अनेकदा तो याबद्दल भाष्य करताना दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सूरजचं चांगलच कौतुक होत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात सूरज (housemate)चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजीत सावंत हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या चौघांपैकी या आठवड्यात कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर जाणार हे पाहावे लागेल.
हेही वाचा :
लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर सुरु राहील का? महायुती सरकारमधील मंत्र्यांनी केलं मोठं वक्तव्य
इचलकरंजीतून राहुल आवाडेच उमेदवार! हातकणंगले आणि शिरोळमधूनही……
कीमोथेरेपी सुरु असताना परत आले केस! कॅन्सरग्रस्त हिना खानचा आनंद गगनात मावेना
“नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाचे धमाकेदार टीजर झाले लाँच!
इचलकरंजी धान्यओळ परिसरातील ट्रॅफिक जाम समस्या गंभीर प्रशासनाच्या त्वरित कार्यवाहीची मागणी
गंभीरच्या एका इशाऱ्याने दोन दिग्ग्जांचा पत्ता कट