चंद्रहार पाटलांच्या अडचणींमध्ये वाढ; मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील(police) यांच्या समोरील अडचणी काही संपण्याचे नाव घेत नाही. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांची अडचण वाढली असताना आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत आणखी एक वाढ झाली आहे.

निवडणूक आयोगाची परवानगी न घेताच तालुक्यातील खटाव आणि बेडग येथे आयोजित केलेली पदयात्रा(police) महागात पडण्याची शक्यता आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी महाविकास आघाड़ीचे उमेदवार उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यावर मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयोगाची परवानगी न घेताच सकाळी साडेनऊ ते दुपारी अड़ीच वाजेपर्यंत दोन गावांमध्ये पदयात्रा काढून आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका चंद्रहार पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात गुन्हा दाखल झाल्याने चंद्रहार पाटील अडचणीत येण्याची शक्यता राजकीय तज्ञाकडून व्यक्त केली जात आहे.

बुधवारी त्यांनी तालुक्यातील बेडग आणि खटाव येथे काही कार्यकर्त्यांसमवेत पदयात्रा काढली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी हातांमध्ये चंद्रहार पाटलांचे फलक घेऊन प्रचार केला. तसेच विविध ठिकाणी मतदारांच्या भेटीही घेण्यात आल्या. मात्र सदर पदयात्रेसाठी पैलवान चंद्रहार पाटील यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे.

याबाबत पोलिसांकडे तक्रारी दाखल होताच ग्रामीण पोलिसांनी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह काही समर्थकांवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे सांगलीतील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. विरोधकांनी षडयंत्र रचून उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे.

हेही वाचा :

पंकजा म्हणाल्या, प्रीतमला नाशिकमधून उभी करेन!

दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, राज्यातील ‘या’ ८ मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष

दारूचा प्रत्येक थेंब करतो नुकसान, लिव्हर किती खराब झालंय हे घरीच तपासा