अजितदादा-शरद पवार पुन्हा एकत्र येणार?, अजित पवार गटातील आमदाराचं सूचक विधान

अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आज (20 जुलै) सकाळी शरद पवार(political) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता अतुल बेनके हे अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का?, अशा चर्चा सुरू आहेत.

या भेटीमुळे राजकारणात(political) आता वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी ही भेट घडली आहे. या भेटीबाबत शरद पवारांनी ही दुजोरा दिलेला आहे. ते आत्ता कोणत्या पक्षात आहेत? ते अजित पवार गटात आहेत, याची मला कल्पना नाही. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे, त्यामुळं यावर फार चर्चा नको, असं शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवारांना माध्यम प्रतिनिधींनी अतुल बेनके तुमच्या पक्षात येणार का? ते तुमच्या भेटीसाठी का आले होते?, असे अनेक सवाल केले. यावर त्यांनी म्हटलं की, आमच्यात काहीही चर्चा झालेली नाही. लोक भेटायला येत असतात. अतुल बेनके यांचे वडील माझे मित्र होते. आमच्या मित्राचा तो मुलगा आहे. यामध्ये काही राजकारण होत असेल तर त्यावेळेला त्याचा निकाल देऊ.

शरद पवार यांच्या या विधानानंतर आता अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. तसंच, लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी काम केले ते आमचे. त्यांच्या हिताची जपणूक ही आमची जबाबदारी आहे, असे सूचक वक्तव्य देखील शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे अतुल बेनके यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा अजूनच वाढल्या आहेत.

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आमदार अतुल बेनके यांनी देखील प्रतिक्रिया दिली. राजकारणात काहीही घडू शकतं, अगदी शरद पवार आणि अजित पवार ही एकत्र येऊ शकतात, असं आमदार अतुल बेनके म्हणाले आहेत.त्यांचं हे विधान आता चर्चेत आलं आहे.

हेही वाचा :

पर्यटनाच्या जागतिक नकाशात महाराष्ट्र ठळकपणे दिसतो?

लग्नाच्या दोन महिन्यानंतर अभिनेत्याला पत्नीने दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रंगेहाथ पकडलं

“तौबा-तौबा” पडले महागात; दिव्यांशचे दात तुटता-तुटता वाचले