राजकीय वाटचालीची प्रेरक यशोगाथा

भाजपचे ज्येष्ठ नेते, (Senior)उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल रामभाऊ नाईक आज (ता. १६ एप्रिल) वयाची नव्वद वर्षे पूर्ण करत आहेत.भाजपचे ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल रामभाऊ नाईक आज (Senior) वयाची नव्वद वर्षे पूर्ण करत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या राजकीय-सामाजिक क्षेत्रातील कार्यावर दृष्टिक्षेप.

उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व भारत सरकारने अलीकडेच ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन ज्यांना सन्मानित केले असे भाजपचे नेते रामभाऊ नाईक यांचा नव्वद वर्षांचा विलक्षण संघर्षमय जीवनप्रवास सर्व अर्थांनी प्रेरणादायी आणि आदर्श म्हणावा असा आहे.

१६ एप्रिल १९३४ रोजी सांगली जिल्ह्यात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली व त्याच परिसरातील आटपाडीसारख्या आडबाजूच्या एका लहान गावात बालपण घालवलेली एक व्यक्ती मुंबई सारख्या महानगरात येऊन स्वत:चे स्थान निर्माण करते, तीन वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेत व पाचवेळा लोकसभेत निवडून जाते.

अटलजींच्या मंत्रिमंडळात स्वतंत्र कार्यभार सांभाळणारा राज्यमंत्री बनून अनेक महत्वाच्या खात्यांचा कारभार पाहते, स्वेच्छेने निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला झाल्यानंतर उत्तर प्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या व अवघड राज्याचे राज्यपाल म्हणून संपूर्ण पाच वर्षांचा कार्यकाल यशस्वीरीत्या पूर्ण करते, ही सगळीच केवढीतरी मोठी ‘यशाची कहाणी’ आहे.

रामभाऊ नाईक यांची ही नव्वद वर्षांची वाटचाल अनेक प्रकारच्या व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनातील संघर्षांनी भरलेली आहे. वयाच्या पंचविशीत रामभाऊ मुंबईत आले. त्यावेळेला त्यांनी शिक्षण पूर्ण करून उपजीविकेचे मार्ग शोधायला सुरुवात केली होती; पण त्याचबरोबर भारतीय जनसंघाचे काम करायलादेखील त्यांनी सुरुवात केली होती.

त्या काळात, १९६०च्या सुमारास जनसंघाचे काम करणे म्हणजे पेटते निखारे हातात घेऊन चालण्याचा प्रकार होता. पण रामभाऊ विचलित न होता ध्येयपथावरून चालत राहिले. वैयक्तिक जीवनाची घडी बसवत असतानाच ते मुंबईत जनसंघाच्या कामाची पायाभरणी व उभारणी करण्याच्या कामात पूर्ण गुंतलेले होते.

१९६९मध्ये त्यांनी खासगी कंपनीतील उत्तम नोकरी सोडून पूर्ण वेळ जनसंघाचे काम करण्याचा निर्णय घेतला व मुंबई जनसंघाचे संघटनमंत्री ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली. १९७५मध्ये आणीबाणीचे संकट भारताच्या लोकशाहीवर आले व इंदिरा गांधींच्या दमनचक्राचा वरवंटा सर्व विरोधी पक्षांवर फिरायला लागला. त्याही काळात रामभाऊ मुंबई जनसंघाचे संघटनमंत्री होते. आणीबाणीच्या विरोधात मुंबई महानगरात उभा राहिलेला लढा संघटित करण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता.

आणीबाणी लागू झाल्याबरोबर जनसंघाचे मुंबईतील सर्व नेते आणि असंख्य कार्यकर्ते तुरुंगात डांबले गेले होते, जे बाहेर होते ते पोलिसांच्या व अटकेच्या भीतीच्या छायेत, जीव मुठीत धरून वावरत होते, काँग्रेसविरोधी अन्य राजकीय पक्षदेखील अशाच अवस्थेत होते.

हेही वाचा :

बागायतदार शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता अनुदानाची प्रक्रिया झाली सोपी

‘तो’ Six बघून वानखेडेच्या ड्रेसिंगरुममध्ये धोनीही Shock! कॅप्टन कूलची Reaction झाली Viral

सांगलीत मोठा ट्विस्ट; महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार, विशाल पाटील अपक्ष लढणार?