शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला तरुणांकडून बेदम मारहाण

दुचाकीच्या टायराखाली आलेला दगड उडून लागल्याने शिवसेना शिंदे(youth) गटाच्या पदाधिकाऱ्याला तरुणाच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. ही धक्कादायक घटना कल्याण पूर्व खडेगोळवली परिसरात घडली. या मारहाणीत शिंदे गटाचे पदाधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी मारहाण(youth) करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे. सुयोग देसाई, असं मारहाण झालेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. या घटनेनंतर कल्याण पूर्व मध्ये सुरू असलेली गुंडागर्दी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग देसाई हे कल्याण पूर्व परिसरात राहतात. बुधवारी रात्रीच्या सुमारास ते दुचाकीने खडेगोळवली परिसरातून जात होते . याच दरम्यान त्यांच्या दुचाकीच्या टायरखाली आलेला दगड उडून रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाला लागला. संतापलेल्या तरुणाने आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन सुयोग यांची दुचाकी थांबवली.

यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाला. वाद इतका विकोपाला गेला, की तरुणांच्या टोळक्याने सुयोग देसाई यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत सुयोग गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मारहाणीनंतरचा सुयोग यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कोळसेवाडी पोलीस तरुणांच्या टोळक्याचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा :

सांगलीवरुन महाविकास आघाडीत बिघाडी! ठाकरे गटाचा टोकाचा इशारा

आकर्षक लूक ,जबरदस्त सेफ्टी फीचर…; महिंद्राचा नवा मॉडेल लाँच

सांगलीच्या जागेवर जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, ‘अपक्ष उमेदवाराची शिफारस…’