काही दिवसांपूर्वी भारताचा क्रिकेट खेळाडू शिखर धवन याने सोशल मीडियावर (cricketer)निवृत्तीची घोषणा केली होती. यावेळी अनेक चाहत्यांच्या निराशाजनक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. एकापाठोपाठ एक भारतीय खेळाडू निवृत्तीची घोषणा करताना दिसत आहेत.
आता जसप्रीत बुमराहसोबत आपल्या करिअरची सुरुवात करणारा वेगवान गोलंदाज(cricketer) बरिंदर स्रानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. ३१ वर्षीय बरिंदर सरनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार काळ टिकली नाही. त्याला भारतीय क्रिकेट संघामध्ये फार जास्त वेळ संधी देण्यात आली आली नाही. त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज बरिंदर स्रान याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून क्रिकेटला अलविदा केला आहे. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मी अधिकृतपणे माझे क्रिकेट बूट लटकवताना, मी कृतज्ञ अंतःकरणाने माझ्या प्रवासाकडे मागे वळून पाहतो.
2009 मध्ये बॉक्सिंगमधून स्विच केल्यापासून, क्रिकेटने मला असंख्य आणि अविश्वसनीय अनुभव दिले आहेत. वेगवान गोलंदाजी हे लवकरच माझे भाग्यवान आकर्षण बनले आणि प्रतिष्ठित IPL फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दरवाजे उघडले, शेवटी 2016 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा सर्वोच्च सन्मान मिळाला.
पुढे त्याने लिहिले आहे की, माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द जरी छोटी असली तरी निर्माण केलेल्या आठवणी कायमच जपल्या जातील. मला योग्य प्रशिक्षक आणि व्यवस्थापन मिळाल्याबद्दल मी सर्वशक्तिमान देवाचा सदैव ऋणी आहे, ज्यांनी माझ्या संपूर्ण प्रवासात मला साथ दिली आणि मला वाटते की आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, मी @pcacricketassociation आणि BCCI यांना त्यांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद देऊ इच्छितो.
या नवीन अध्यायाला सुरुवात करताना, क्रिकेटने मला दिलेल्या संधींबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. शेवटी एक म्हण आहे की, “आकाशाप्रमाणेच स्वप्नांनाही मर्यादा नसतात”, म्हणून स्वप्न पाहत राहा.
हेही वाचा:
काँग्रेसचा ‘तो’ आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश
1 सप्टेंबर रोजी मुंबईत ‘जोडे मारा’ आंदोलन; उद्धव ठाकरे, शरद पवार, आणि नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती
स्ट्रक्टरल कन्सल्टंट चेतन पाटीलला मध्यरात्री कोल्हापुरातून उचललं, चौकशीतून पुतळ्याबाबत नवी माहिती समोर…