अनुज थापन आत्महत्या चौकशीच्या सीलबंद अहवालात काहीही गोपनीय नाही. हा अहवाल त्याच्या कुटुंबीयांना(family) दाखवा, असे आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने राज्य सीआयडीला दिले. हा अहवाल कोणालाही दाखवता येणार नाही, असा दावा सीआयडीने केला होता. न्यायालयाच्या आदेशाने सीआयडीच्या दाव्याला चांगलीच चपराक बसली आहे.
न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेकर सुंदरसेन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. थापनने पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची चौकशी सीआयडी करत आहे. महानगर दंडाधिकारी यांच्यामार्फतही याची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. सीआयडी चौकशीचा सीलबंद अहवाल सरकारी वकील जयेश याज्ञिक यांनी न्यायालयात सादर केला. हा अहवाल कुटुंबीयांना(family) देण्यात यावा, अशी मागणी थापनच्या वकिलांनी केली, यास अॅड. याज्ञिक यांनी विरोध केला.
हा अंतरिम चौकशी अहवाल आहे. हा अहवाल दाखवता येणार नाही. हा अहवाल दाखवला तर अजून काही वेगळी मागणी केली जाईल. मुळात अशा प्रकारे सीलबंद अहवाल देता येत नाही, असे एका निकालात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. माहिती अधिकारातही सीलबंद चौकशी अहवाल देता येत नाही, असे अॅड. याज्ञिक यांनी न्यायालयाला सांगितले.
या अहवालात गोपनीय काही नाही. मग अहवाल देण्यास तुमचा विरोध का? असा सवाल न्यायालयाने केला. नियमानुसार सीलबंद अहवाल कोणालाच दाखवता येत नाही. तरीही याबाबत न्यायालय जो काही आदेश देईल तो आम्हाला मान्य असेल, असे अॅड. याज्ञिक यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
मोदी आता मुंबईत काय विकायला येत आहेत ? संजय राऊत
काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह 25 जणांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
मोदी सरकारचा मोठा निर्णय! औषधांच्या किमती 12 टक्क्यांनी झाल्या महाग