अनुराग कश्यपने बॉलिवूड इंडस्ट्रीची काढली अक्कल; घेतला सर्वात मोठा निर्णय

बॉलिवूडचा(Bollywood industry) प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने हल्लीच्या काळातील चित्रपटसृष्टीवर असंतोष व्यक्त करून एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्याने मुंबई सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे, त्यामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

अनुराग कश्यपने(Bollywood industry) एका मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीवर जोरदार टीका केली आहे. “हिंदी फिल्म इंडस्ट्रीला काहीच समजत नाही. कारण ते ‘पुष्पा’सारखा चित्रपटसुद्धा बनवू शकत नाही. कारण त्यांच्याकडे तेवढं डोकंच नाही. तसेच चित्रपटनिर्मिती म्हणजे काय, हेच अजूनही त्यांना समजत नाही”, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, “सुकुमारसारखे दिग्दर्शकच ‘पुष्पा’सारखा चित्रपट बनवू शकतात. कारण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत दिग्दर्शकांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते आणि त्यांना चित्रपट बनवण्यास देखील सक्षम केलं जातं. तसेच इथे प्रत्येकजण विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना स्वत:चं विश्व तरी माहितीये का? आणि त्यात त्यांचं अस्तित्त्व सुद्धा किती लहान आहे हे माहितीये का? मात्र हा त्यांचा अहंकार आहे. जेव्हा तुम्ही विश्व निर्माण करता, तेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्हीच देव आहात.” असं अनुराग कश्यप म्हणाले आहेत.

याशिवाय अनुराग कश्यपने स्टुडिओ मॉडेलवर देखील निशाणा साधला आहे. कारण स्टुडिओ मॉडेलमुळे क्रिएटिव्हीला स्थान मिळत नसल्याची तक्रार अनुरागने बोलून दाखवली आहे. तसेच सध्या मला इथे काही नवीन प्रयोग करायलाच मिळत नाही. कारण इथे पैशांचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच माझे निर्माते आधी नफ्याचा विचार करतात. याशिवाय चित्रपट बनवण्यास सुरुवात होण्यापूर्वीच तो विकला कसा जावा, याचा देखील विचार केला जातोय. यामुळे चित्रपट बनवण्याची मजा निघून जात असल्याचं अनुराग कश्यपने म्हंटल आहे.

अनुराग कश्यपने या सर्व गोष्टींमुळे मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी स्पष्ट देखील केले आहे की, हिंदी चित्रपटसृष्टीतील असंतोषामुळे ते मुंबई सोडण्याचा निर्णय घेत आहेत. कारण आता चित्रपट बनवण्यात उत्साह राहिला नाही आणि त्यामुळे त्यांनी मुंबई सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा :

नव्या वर्षात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का…

हॉर्न वाजवल्याने गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरला शिवीगाळ, तुफान राडा; दुकानांची जाळपोळ

धनंजय मुंडेंचा पक्षातूनच गेम होतोय ?; पालकमंत्रीपद लांबच राहिलं आता मंत्रिपदही जाणार?