अकायच्या जन्मानंतर बदलला अनुष्का शर्माचा लूक; घायाळ करणारे सौंदर्य

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही अनेकदा चर्चेत असते. टीम इंडियाचा धडाकेबाज(birth) फलंदाज विराट कोहली याच्यासोबत तिने लग्नगाठ बांधत आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. या सेलिब्रिटी कपल्सला 2021 मध्ये वामिका ही मुलगी झाली. त्यानंतर आता 15 जानेवारी 2024 मध्ये त्यांना अकाय हा मुलगा झाला.

लंडनमधील रुग्णालयात अकायचा जन्म(birth) झाल्यानंतर अनुष्का भारतात परतली आहे. त्यानंतर आता तिने आयपीएलच्या सामन्यात विराट आणि त्याच्या टीमला पाठिंबा देण्यासाठी थेट बेंगळुरूच्या स्टेडियममध्ये हजेरी लावली. यावेळी अनुष्काच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधले.

19 मे रोजी बेंगळुरू आणि चेन्नई यांच्यातील शेवटच्या सामन्यानंतर अनुष्का शर्मासोबत काही चाहत्यांनी फोटो काढले. विराट कोहलीच्या संघाने सामना जिंकल्यानंतर अनुष्का आनंदाने उड्या मारताना दिसली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक फोटोंमध्ये प्रेग्नेंसीनंतर अनुष्का आणखीनच सुंदर दिसत आहे. एका फोटोत भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनादेखील अनुष्कासोबत दिसली. या दोघींचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला.

अनुष्काने ब्लॅक स्लीव्हलेस ड्रेस परिधान केला होता. यावेळी तिने लूक पू्र्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला. ओपन हेअरस्टाइलमुळे अनुष्का आणखीच सुंदर दिसत होती. गरोदरपणानंतर अभिनेत्रीचे वजन वाढले असल्याचे दिसून येते. पण, अनुष्काचे सौंदर्य आणखीचं खुललं आहे.

Anushka Sharma New Look  Photo : अकायच्या जन्मानंतर बदलला अनुष्का शर्माचा लूक, IPLच्या सामन्यात दिसलं घायाळ करणारे सौंदर्य

विराट-अनुष्का यांनी आतापर्यंत आपल्या दोन्ही मुलांचा चेहरा मीडियासमोर आणला नाही. अकायच्या जन्मानंतर त्याच्याबाबततची गोपनीयता विरुष्काने राखली आहे. त्याचा पहिला चेहरा समोर आला नाही.

https://twitter.com/i/status/1792040476931203165

वामिका आणि अकायचे फोटो न काढत खासगीपणा जपण्याची विनंती विराट-अनुष्काने पापाराझींना केली होती. पापाराझींनीदेखील विराट-अनुष्काच्या विनंतीला मान देत दोन्ही मुलांचे फोटो काढले नाही. त्यानंतर पापराझींचे आभार मानण्याासाठी विरुष्काने त्यांना गिफ्ट दिले.

हेही वाचा :

गौतमी पाटीलच्या नवीन VIDEO तील अदांनी चाहत्यांना लावलं वेड

लग्नाचा बस्ता बांधून निघालेल्या नवरदेवासह बहीण आणि भाची अपघाती मृत्यू

हृतिक रोशनची गर्लफ्रेंड EX पत्नी बेस्ट फ्रेंड्स! एकमेकांना ‘या’ नावानं मारतात हाक