संपूर्ण राज्यात कुलाब्यातील उच्चभ्रू मतदारांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानात कमालीची उदासीनता दाखवल्याची आकडेवारी पुढे आली आहे. कुलाबा मतदारसंघात राज्यात सर्वात कमी म्हणजे फक्त 43.68 टक्के (percent)मतदान झाले. तेरा लोकसभा मतदारसंघांत झालेल्या निवडणुकीत एकूण 56.89 टक्के मतदान झाले.
मुंबईतील सहा मतदारसंघाबरोबरच राज्यातील एकूण 13 मतदारसंघांसाठी पाचव्या टप्प्यात सोमवारी मतदान पार पडले. मतदानानंतर मंगळवारी रात्री अंतिम आकडेवारी जाहीर झाली.(percent)
या आकडेवारीनुसार 13 मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदान हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात झाले आहे. या मतदारसंघात 66.75 टक्के मतदान पूर्ण झाले आहे. तर धुळे मतदारसंघात 60.21 टक्के मतदान झाले. या 13 मतदारसंघांतील जवळपास चार मतदारसंघांत 60 आणि 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचे यावेळी आकडेवारीतून कळते. कल्याण मतदारसंघात 50.12 टक्के तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात 50.6 टक्के मतदान झाले.

मतदानाची आकडेवारी
भिवंडी – 59.89 टक्के
धुळे – 60.21 टक्के
दिंडोरी – 66.75 टक्के
कल्याण – 50.12 टक्के
उत्तर मुंबई – 57.02 टक्के
उत्तर मध्य मुंबई – 51.98 टक्के
उत्तर पूर्व मुंबई – 56.37 टक्के
उत्तर पश्चिम मुंबई – 54.84 टक्के
दक्षिण मुंबई – 50.06 टक्के
दक्षिण मध्य मुंबई – 53.60 टक्के
नाशिक – 60.75 टक्के
पालघर – 63.91 टक्के
ठाणे – 52.09 टक्के
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात भायखळा विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक 52.72 टक्के मतदान झाले. भायखळा मतदारसंघात मुस्लिम वस्त्यांमधून हुकूमशाहीविरुद्ध मतदानाला उदंड प्रतिसाद लाभला. शिवडी, वरळी, मलबार हिल आणि मुंबादेवी या मतदारसंघांतील मतदानाची टक्केवारीही 50 टक्क्यांपेक्षा जास्त राहिली.
हेही वाचा :
ठाकरे कुटुंबातला तो मुलगा कोण? जो राजकारण नाही बॉलिवूडमध्ये येणार
महंगाई डायन… ऑक्टोबरपर्यंत डाळींचे भाव कमी होणार नाहीत
गर्भपाताच्या गोळ्यांचे रॅकेट थेट परराज्यातून कोल्हापुरात…