वादग्रस्त टिप्पणीनंतर अपूर्वा मखीजाला जबरदस्त धक्का, IIFA च्या Ambassador च्या यादीतून नाव वगळले

कॉंटेंट क्रिएटर अपूर्व मखीजा, रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना सध्या कमालीचे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हे वादात सापडण्याचे कारण ठरलाय, ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो(Entertainment news). या शोमुळे ते जबरदस्त वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शोमध्ये अपूर्वाने केलेल्या वादग्रस्त टिप्पणीनंतर तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, सोबतच तिला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

खरंतर, अपूर्वाला सोशल मीडियावर ‘द रिबेल किड’ तिच्या ह्या युजरनेमने चाहते ओळखतात. अपूर्वा ही इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स (आयफा)ची ब्रँड ॲम्बेसेडर होती, परंतु तिने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये केलेल्या वादग्रस्त टिप्पणीनंतर तिला ॲम्बेसेडर पदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. पुढच्या महिन्यात राजस्थानच्या जयपूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार सोहळ्याच्या अधिकृत राजदूतांच्या यादीतून तिला काढून टाकण्यात आले आहे.

हा निर्णय, कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब (Entertainment news)शोच्या एका भागात रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजाच्या वादग्रस्त टिप्पणीनंतर घेण्यात आला आहे. या भागात यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने पालकांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती. अपूर्व मखीजाला आयफा आणि राजस्थान टुरिझमसाठी एक व्हिडिओही शूट करावी लागणार होती. पण आता अपूर्वाचे नाव आयफा ॲम्बेसेडर यादीतून काढून टाकण्यात आले आहे.

“आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार सोहळ्याच्या (आयफा) यादीतून सोशल मीडियावर प्रसिद्ध असणाऱ्या अपूर्वा मखीजाचे नाव ॲम्बेसेडरच्या यादीतून काढून टाकण्यात आले आहे. ती आता अधिकृतपणे आयफाच्या ॲम्बेसेडरच्या यादीचा भाग नाही.” असं राजस्थानच्या पर्यटन मंत्री आणि उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.

पीटीआय या वृतसंस्थेच्या रिपोर्टनुसार, करणी सेनेने म्हटले आहे की, अश्लीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या कोणालाही केवळ विरोधाला सामोरे जावे लागणार नाही तर त्यांना शारीरिकदृष्ट्याही सामोरे जावे लागेल असे उदयपूरमधील राजपूत करणी सेनेचे विभाग प्रमुख डॉ. परमवीर सिंग दुलावत यांनी सांगितले आहे. करणी सेनेने दिलेल्या धमक्यांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अपूर्वाला या महिन्याच्या अखेरीस उदयपूरमध्ये होणाऱ्या आयफा शोसाठी शूटिंग करायचे होते. करणी सेनेने शुटिंगला विरोध करत अपूर्वाला ॲम्बेसेडरच्या यादीतून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी केली होती.

राजस्थान पर्यटन मंत्रालयाच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 8 आणि 9 मार्च रोजी जयपूर येथे होणार आहे. यापूर्वी अपूर्वाला या कार्यक्रमासाठी ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र, आता तिचे नाव या यादीतून काढून टाकण्यात आले आहे.

हेही वाचा :

लग्नासाठी नवरदेव सजला पण घोड्यावरच घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचा थरारक Video Viral

LIC ने पॉलिसीधारकांसाठी लाँच केला नवीन प्लॅटफॉर्म

गुंतवणूकदारांसाठी आकर्षक संधी! ‘ही’ कंपनी देत आहे एका शेअर वर एक शेअर बोनस!