धनंजय महाडिक यांच्या येथील कार्यालयात झालेल्या मेळाव्यात महायुतीतील(latest political news) खदखद बाहेर आली आहे. समरजितसिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांना सन्मान देत नाहीत. कामं करत नाहीत. म्हणून आम्हाला महायुतीतून मोकळे करा. मग युवा शक्तीची ताकद दाखवतो, अशा भावना धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. यावरून महायुतीत काही अलबेल नाही असं सध्याचं चित्र आहे.
कागल विधानसभा मतदारसंघातील धनंजय महाडिक(latest political news) युवा शक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांचा छोटेखानी मेळावा झाला. विजय फुटाणे, सागर देसाई, पिंटू मांगले, समीर चांद, सागर गंधवाले, स्वप्नील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी युवा शक्तीचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष बाळ बोटे-पाटील म्हणाले, ‘आमच्यासाठी धनंजय महाडिक नेते आहेत. ते ज्या पक्षात जातील तो आमचा पक्ष पण आम्ही कोणत्या पक्षाचे नाही. आम्ही सर्व महाडिक परिवाराचे आहोत. हसन मुश्रीफ यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गद्दारी केली. २०१४ मध्ये तुम्ही खासदार झाल्यावर कागलसाठी सर्वाधिक निधी दिला, पण तुम्हाला त्यांनी उद्घाटनाला बोलावलं नाही.
महाडिकांचा कार्यकर्ता मोठा होऊ नये म्हणून आजरा नगरपालिका निवडणुकीत समीर चांदला दोन मतांनी पाडलं. नलवडे साखर कारखान्याच्या निवडणुकीत माझी उमेदवारी रद्द केली. आता कार्यकर्त्यांनी घाटगे आणि मुश्रीफ यांचा प्रचार कसा कारयचा. आम्हाला महायुतीमधून मोकळे करा, मग युवा शक्तीची ताकद दाखवतो. माझ्या प्रत्येक संघर्षात तुम्ही साथ दिली. त्यामुळेच तुम्ही सर्व महाडिक परिवाराचा भाग आहात. राजकारणात नेहमी संयमी भूमिका घ्यावी लागते.
आज मी भाजपमध्ये आहे. पक्षाने मला राज्यसभेचा खासदार केले. पक्षातील मोठी जबाबदारी दिली. त्यामुळे जिल्ह्यात विकासाची अनेक कामे करू शकलो. सत्ता असेल तर आपण सर्वकाही करू शकतो. यासाठी संभ्रम मनात न ठेवता महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रयत्न करा. यावेळी कृष्णराज महाडिक, माजी नगरसेवक सत्यजित कदम, शिवाजी मगदूम, जोतिराम जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा:
इचलकरंजी गणेश विसर्जनानिमित्त एसटी वाहतूक मार्गात बदल
छगन भुजबळ सांगत आहेत अंतरवालीचे पवार कनेक्शन
ब्रेस्ट कॅन्सरसोबत लढा देणाऱ्या हिना खानचा नववधूच्या वेशात रॅम्पवॉक
राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली