निवडणूक आयोगाला ८ मतदारसंघांतून अर्ज

मतदारसंघातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी करणारे आठ अर्ज निवडणूक (election)आयोगाला प्राप्त झाले आहेत. सहा राज्यांतील आठ लोकसभा मतदारसंघांतून हे अर्ज आले असून महाराष्ट्रातून अहमदनगर मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागणारे भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांनीही अर्ज केला आहे.लोकसभा निवडणुकीत डॉ. विखेंचा २८,९२९ मतांनी पराभव झाला. मतदारसंघातील ४० मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करावी, अशी मागणी विखेंनी केली आहे.

ईव्हीएम यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा संशय निराधार असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाने २६ एप्रिल रोजी कागदी मतपत्रिकांचा वापर पुन्हा करण्याची मागणी फेटाळली होती. मात्र निवडणुकीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच टक्के मतदान यंत्रांची पडताळणी करण्याची मागणी केल्यास त्याला परवानगी देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला होता.

हेही वाचा :

टीम इंडियाच्या विजयानंतर कॅप्टन रोहितचा मोठा खुलासा, म्हणाला…

भाजपाची रणनीती लवकर जागा वाटप

सांगली, जमीन नोंदीसाठी १० हजाराची लाच घेताना तलाठ्याला अटक