तू सेक्सची निवड कर..; अरबाज खानचा मुलाच्या मित्राला अजब सल्ला, मलायकाची प्रतिक्रिया चर्चेत

अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा(bff) यांचा मुलगा अरहान खानने त्याच्या करिअरसाठी थोडा वेगळा मार्ग निवडला आहे. नुकतंच त्याने पॉडकास्टर म्हणून पदार्पण केलं असून ‘डंब बिर्याणी’ हा त्याचा पॉडकास्ट नेटकऱ्यांच्या भेटीला आला आहे. पॉडकास्टच्या या पहिल्या सिझनमध्ये सहा विविध भाग असणार आहेत. यामध्ये अरहानचे मित्रसुद्धा सहभाग होणार आहेत.

नुकत्याच एका एपिसोडमध्ये अरहारचे वडील अरबाज खान(bff) आणि मामा सोहैल खान पाहुणे म्हणून उपस्थित झाले होते. यावेळी अरहाजन आणि त्याच्या मित्रांसोबत दोघांनी डेटिंग, रिलेशनशिप्स आणि इतर विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. या एपिसोडचा टीझर अरहानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या टीझरमधील अरबाजच्या एका अजब सल्ल्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. त्यावर आता मलायकानेही प्रतिक्रिया दिली आहे.

या टीझरच्या सुरुवातीला अरहान वडिलांना मजेत विचारतो, “तुमच्या रुमला ते बर्मुडा ट्रँगल का म्हणतात?” यानंतर पुढे सोहैल त्याचा गमतीशीर किस्सा सांगतो. “माझ्या एक्स गर्लफ्रेंडच्या घरी आम्ही डार्क रुम हा खेळ खेळत होतो. मी तिच्या वॉर्डरोबमध्ये जाऊन लपलो होतो. तेव्हा माझ्या गर्लफ्रेंडची आईसुद्धा त्याच वॉर्डरोबमध्ये लपली होती”, असं तो सांगताच सर्वजण हसू लागतात. यानंतर अरहानचा एक मित्र त्याच्या डेटिंग लाइफविषयी गंभीरपणे बोलत असतो. तेव्हा अरबाज त्याला अजब सल्ला देतो.

“माझ्या मते तू सेक्सची निवड करायला पाहिजे”, असं तो म्हणतो. सोशल मीडियावर या टीझरवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर मलायकानेही कमेंट केली आहे. अरहानने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या टीझरवर मलायकाने हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.

अरबाज खान आणि मलायका अरोरा हे 2017 मध्ये विभक्त झाले. या दोघांना अरहान खान हा मुलगा आहे. अरहानचा जन्म 2002 मध्ये झाला. आता तो 22 वर्षांचा आहे. अरहान आईवडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत चित्रपटसृष्टीत काम करणार का, असा प्रश्न अरबाजला एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “अरहान आता इंडस्ट्रीत ‘हॉट प्रॉपर्टी’ झाला असून माझ्याआधी त्याला कोणी लाँच केलं तर आनंदच होईल.” त्याचसोबत बॉलिवूड पदार्पणाविषयीचा शेवटचा निर्णय हा अरहानचाच असेल, असंही त्याने स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा :

अमोल कोल्हेंचा भाजपला दे धक्का; ‘हा’ नेता करणार शरद पवार गटात प्रवेश!

नाना पटोले यांच्या कार अपघातप्रकरणी मोठी अपडेट; ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात

मुंबईविरुद्ध आरसीबीमध्ये ‘हाच’ संघ जिंकणार, चक्क श्वानाने सांगितलं भविष्य?