कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री(politicians) बाबा सिद्दिकी यांची हत्या होऊन काही महिने होऊन गेले. तपास अधिकाऱ्यांनी विष्णोई टोळीच्या गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याविरुद्ध सुमारे साडेचार हजार पानांचे दोषारोप पत्र मुंबईच्या सत्र न्यायालयात दाखल करूनही काही दिवस झाले आहेत. आता बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांनी तेव्हा पोलिसांना दिलेल्या जबाबावरुन आरोप आणि प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात वेगळेच आरोपी आहेत असे संशयास्पद वातावरण काही जणांच्याकडून हेतू पुरस्सर
तयार केले जात आहे. वांद्रे परिसरातील एका झोपडपट्टीचे चांगल्या वसाहतीमध्ये पुनर्वसन केले जाणार होते. हे काम मिळवण्याच्या संदर्भात बाबा सिद्दिकी, अनिल परब, मोहित कंबोज हे प्रयत्नशील होते.
हे तिघेही या कामाच्या संदर्भात परस्परांशी संपर्कात होते, संवाद साधत होते, मोबाईलच्या माध्यमातून या तिघांच्या मध्ये हा संवाद होत होता. अनिल परब यांनी झोपडपट्टी वासियांना वेगळे आश्वासन दिले होते. त्यातून या तिघांमध्ये विसंवाद निर्माण झाला होता. अशा प्रकारचा जबाब झिशान सिद्दीकि यांनी बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना लिखित स्वरूपात दिला होता. हा एकूण जबाबच प्रसार माध्यमांच्या हाती लागल्यानंतर आणि तो प्रसारित केल्यानंतर उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
उबाठा सेनेचे विद्यमान आमदार(politicians) अनिल परब तसेच भारतीय जनता पक्षाचे मोहित कंबोज यांच्यावरच अप्रत्यक्षपणे बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा ठपका ठेवला जाऊ लागला आहे किंवा तसा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. वास्तविक झिशांत सिद्दिकी यांचा तपास अधिकाऱ्यांनी सविस्तर जबाब नोंदविल्यानंतर, त्यांच्या जबाबांमध्ये ज्यांची नावे आली आहेत, त्यांचेही जबाब नोंदवून घेतले गेले आहेत. किंबहुना तपासाची ती एक प्रकारची पद्धतच असते. झिशान सिद्दीकी यांना अनिल परब तसेच मोहित कंबोज यांच्यावर थेट आरोप करता आले असते. त्यांनी या दोघांची नावे जबाबात घेतल्यामुळे, ते आरोपी ठरू शकत नाहीत.
किंबहुना या हत्या प्रकरणाचा तपास विष्णूई गँगच्या गुन्हेगारांना रीतसर अटक करून तपास केला जात असताना तपास अधिकारी हे वेगळ्या अँगलने तपास करणे शक्य नाही. बाबा सिद्दिकी यांची हत्या भर दिवसा रहदारीच्या ठिकाणी गोळ्या झाडून बिश्नोई गँगच्या गुन्हेगारांनी केली आहे. हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. आता त्यामध्ये वेगळे काही ट्विस्ट आणून काही राजकारण्यांना त्यातून काय सिद्ध करावयाचे आहे हे समजत नाही.

अनिल परब हे उद्धव ठाकरे(politicians) यांच्या खास वर्तुळातील आहेत आणि मोहित काम्बोज हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील आहेत. आणि या दोघांची नावे झिशान सिद्दिकी यांच्या जबाबात आली असल्यामुळे त्यावर आता चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा अगदी खोलात जाऊन तपास केला आहे. संशयित आरोपींच्या विरुद्ध सुमारे साडेचार हजार पानांचे दोषारोप पत्र सत्र न्यायालयात दाखल केले आहे. त्यामुळे तपास अधिकारी या तपास प्रकरणातून आता बाहेर पडले आहेत. आता हे प्रकरण सत्र न्यायालयात जाऊन पोहोचल्यामुळे, या खटल्याच्या सुनावणीची प्रतीक्षा केली पाहिजे. असे असताना या हत्या प्रकरणात न्यायालयाच्या बाहेर उलट सुलट चर्चा होणे चुकीचे आहे. या उलट सुलट चर्चेचा आरोपींच्या वकिलांकडून बचावासाठी उपयोग केला जाऊ शकतो.
महाराष्ट्रातील काही राजकारणी कोणत्याही विषयावर”व्यक्त”होत असतात. प्रतिक्रिया देण्यासाठी आम्हाला कोणत्याही विषयाचे बंधन नाही, एखादी घटना घडल्यानंतर माध्यमांचे प्रतिनिधी येतात आणि आमची प्रतिक्रिया विचारतात म्हणून मग आम्ही व्यक्त होत असतो असा ते युक्तिवाद करतात. संवेदनशील प्रकरणात चर्चा उपस्थित करताना काही पथ्य पाळले पाहिजे, याचे भानही त्यांना नसते.
आपण राजकारणी असल्यामुळे, आपण आमदार, खासदार तसेच माजी मंत्री असल्यामुळे आपणाला सर्व गुन्हे माफ आहेत अशा अविर्भावात ही मंडळी वाटेल ते बोलत असतात. एखाद्या प्रकरणाचा तपास होऊन ते प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतरही तोच विषय वेगळ्या पद्धतीने चर्चेत आणणे याचे समर्थन कोणीही करणार नाही. समाधानाची एक बाब म्हणजे या प्रसिद्धी विनायकांचे म्हणणे सर्वसामान्य जनता आता गांभीर्याने घेत नाही.
हेही वाचा :
शाहरुख खानची लेक क्रिकेटर रिंकू सिंहबरोबर फिरायला गेली?
शुभ योग; 3 राशींचं भाग्य उजळणार, पैशाची आवक वाढणार
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा मसाला फ्रेंच टोस्ट