चेहऱ्यावर पिंपल्स वाढले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून चेहरा करा स्वच्छ, पिंपल्स होतील गायब

सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना करत असतात. कधी चेहऱ्यावर(pimples) फेसपॅक लावणे तर कधी फेशिअल करून घेणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण सतत काहींना काही त्वचेवर लावल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर लवकर चेहरा चांगला होत नाही. त्यामुळे त्वचेवर कोणतेही पदार्थ लावण्याऐवजी चेहऱ्याला सूट होतील असेच पदार्थ लावावे, ज्यामुळे इन्फेक्शन किंवा पिंपल्स येणार नाहीत. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा जास्तच कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. शिवाय आहारात विटामिन किंवा जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम किंवा फोड येऊ लागतात. शिवाय अनेक महिला आणि मुलींच्या त्वचेवर कमी वयातच काळे डाग किंवा वांग येऊ लागतात.

पिंपल्स, मुरूम आल्यानंतर त्वचेवर डाग तसेच राहतात. त्वचेवर आलेले डाग घालवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल ट्रीटमेंट करून घेतात. मात्र त्याचा फारसा प्रभाव त्वचेवर दिसत नाही. त्वचा सुंदर आणि उजळदार करण्यासाठी केमिकल उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावे. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या उजळदार आणि सुंदर होण्यास मदत होते. शिवाय (pimples)त्वचेची गुणवत्ता सुधारू लागते. चेहऱ्यावर आलेले डाग, ऍक्ने निघून जातात आणि त्वचा सुंदर होते.

चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा ऍक्नेचे डाग घालवण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकता. कडुलिंब संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. आरोग्य आणि त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर केला जातो. यासाठी 15 ते 20 कडुलिंबाची पाने घेऊन स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मिक्सरमधून या पानांची बारीक पेस्ट तयार करा. पेस्ट तयार झाल्यानंतर गाळणीच्या सहाय्याने घालून त्यातील पाणी वेगळे करा. नंतर त्यात 1 चमचा एलोवेरा जेल, 1 चमचा मध, (pimples)2 चमचे गुलाब पाणी आणि बेबी वॉश क्रीम टाकून मिक्स करा.

तयार करून घेतलेले मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. या मिश्रणाचा वापर फेसवॉश म्हणून करा. चेहरा स्वच्छ करताना कोणत्याही साबणाचा किंवा फेसवॉशचा वापर न करता तयार केलेल्या मिश्रणाचा वापर करा. यामुळे त्वचेवर आलेले पिंपल्स कमी होतील आणि चेहरा स्वच्छ होईल. तयार केलेले मिश्रण दिवसभरातून दोन ते तीन वेळा वापरा. यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारेल. काही दिवसांमध्ये फरक दिसू लागेल. यामुळे तुमच्या त्वचेवर आलेले पिंपल्स, डाग, ऍक्ने इत्यादी सर्व गोष्टी निघून जातील.

हेही वाचा :

महाविकास आघाडीत फूट? स्वबळाचा सूर टिपेला, नेत्यांचा दबाव वाढला; कोणता पक्ष बाहेर पडणार?

धक्कादायक! विजेच्या तारांवर लटकून तरुणीचा हाय व्होलटेज ड्रामा

‘मला मोदींचा फोन आला होता…’; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा