सांगली शहरात ‘एआय डेटा लॅब’ देणार आहात? : खासदार विशाल पाटील

सांगली : खासदार विशाल पाटील यांनी संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे सांगलीसारख्या छोट्या शहरांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा लॅबच्या(data lab) उपलब्धतेवर चर्चा झाली. केंद्र सरकारच्या आगामी २७ AI डेटा लॅबच्या योजनांवर त्यांनी सरकारचा हेतू आणि त्या लॅबचा शेतकऱ्यांसाठी होणारा फायदा स्पष्ट करण्याची मागणी केली.

विशाल पाटील म्हणाले की, “सांगलीसारख्या छोट्या शहरांमध्ये अशा AI डेटा लॅब(data lab) उभारल्या गेल्यास, स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळून त्यांचे कौशल्य वाढू शकते. यामुळे शेती उत्पादन व बाजारपेठ निर्मितीमध्ये सुधारणा होईल.” त्यांनी देशभरात होणाऱ्या ९७ मिलियन AI नोकऱ्यांच्या संभाव्यतेचा उल्लेख करून, शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा मिळू शकतो, यावर भर दिला.

माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रश्नाला उत्तर देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अशा योजना लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे सांगितले. मात्र, विशाल पाटील यांनी उत्तर अपुरे असल्याचे नमूद करून सरकारकडून स्पष्ट धोरणाची अपेक्षा व्यक्त केली.

श्री. पाटील यांनी पुढील मुद्दे मांडले:

  1. सांगलीसारख्या शहरांचा समावेश: लहान शहरांमधील शेतकऱ्यांसाठी अशा लॅबचा लाभ मिळावा, यासाठी सरकारकडे कोणती ठोस योजना आहे?
  2. AI प्रशिक्षणाची गरज: भारतात पारंपरिक नोकऱ्यांच्या जागी AI-आधारित नोकऱ्या निर्माण होतील, परंतु सध्या प्रशिक्षण घेतलेल्यांची संख्या अपुरी आहे.
  3. नवीन रोजगार निर्मिती: AI लॅबद्वारे देशात नव्या प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होणार असल्या तरी त्या नोकऱ्यांसाठी पुरेसे प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कसे केले जात आहे?

या चर्चेमुळे सांगलीसारख्या भागांना भविष्यात AI-आधारित विकास आणि रोजगार संधी मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा :

CSMT जवळ बेस्ट बसने एकाला चिरडलं; जागीच मृत्यू

‘पुष्पा 2’ सुरू असतानाच चित्रपटगृहात तरुणाचा मृतदेह, तरीही सुरूच होता सिनेमा…

पवार एकत्र आले, शिंदेंची गरज संपेल… कशी?; अजित पवार-शरद पवार भेटीमागचे नेमके संकेत काय?