मुंबई: मुंबईतील अंधेरी (पश्चिम) वर्सोवा येथील डी-मार्ट स्टोअरमध्ये मराठीत न बोलण्यावरून वाद निर्माण झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी एका कर्मचाऱ्याला(employees) मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकारामुळे मोठी चर्चा रंगली आहे.

मंगळवारी संध्याकाळी एका ग्राहकाने स्टोअरमधील कर्मचाऱ्याशी(employees) मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्याने हिंदीतच उत्तर देत मराठीत बोलण्यास नकार दिला. त्याने कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत सांगितले, “मी मराठी बोलणार नाही, फक्त हिंदी बोलेन. तुम्हाला जे करायचे ते करा. ग्राहकाने वारंवार मराठीत बोलण्याचा आग्रह धरला असता, कर्मचाऱ्याने अधिक आक्रमक होत उत्तर दिले, “जर मी मराठीत बोललो नाही तर तुम्ही काय कराल? तुम्हाला काय झालं?” यावरून दोघांमध्ये वाद उफाळला.
या घटनेची माहिती मिळताच मनसेचे स्थानिक पदाधिकारी स्टोअरमध्ये पोहोचले. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला आणि संबंधित कर्मचाऱ्यांना मराठी न बोलण्याबाबत विचारणा केली. त्यानंतर वाद अधिक चिघळला आणि मनसे कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. अखेरीस, या कर्मचाऱ्यांना मराठीत माफी मागण्यास भाग पाडण्यात आले.
या घटनेनंतर मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याने(employees) बुधवारी कामावर न येण्याचा निर्णय घेतला. तो स्टोअर मॅनेजरच्या हाताखाली काम करायचा. आता या घटनेनंतर दोघांनाही नोकरी गमावण्याची भीती वाटत आहे.डी-मार्ट स्टोअरचे अधिकारी आणि कर्मचारी या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. पोलिसांकडूनही अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणावर विधानसभेबाहेर बोलताना कॅबिनेट मंत्री नितेश राणे म्हणाले, “जर तुम्हाला महाराष्ट्रात राहायचे असेल, तर तुम्हाला मराठी भाषा येणे आवश्यक आहे. दरम्यान, काही इतर ग्राहकांनीही प्रतिक्रिया देत म्हटले की, “महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. मात्र, कोणावरही जबरदस्ती केली जाऊ नये, तसेच गुंडगिरीच्या पद्धतीने हे घडू नये.” ही घटना मराठी भाषेच्या संवर्धनाच्या चर्चेला नव्याने चालना देणारी ठरली आहे.
दरम्यान, मुंबईतील चारकोप येथे एअरटेल गॅलरीमध्येही मराठी भाषेवरून वाद निर्माण झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. येथे एका हिंदी भाषिक कर्मचाऱ्याने “महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी का बोलायला पाहिजे?” असे म्हणत ग्राहकाशी हुज्जत घातली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एका मराठी ग्राहकाने मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित महिला कर्मचाऱ्याने आक्रमक पवित्रा घेत उत्तर दिले, “क्यूं मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ है? हम हिंदुस्तान में रहते हैं.” तिने असेही म्हटले की, भारतात कोणालाही कोणतीही भाषा बोलण्याचा अधिकार आहे आणि मराठी बोलण्याची कोणतीही सक्ती करता येणार नाही.
हेही वाचा :
सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ योजनेअंतर्गत पात्र महिला व वृद्धांना मिळणार ‘एवढी’ रक्कम!
मुलांसमोरच दिराचा जबरदस्तीने वहिनीवर अत्याचार; पीडितेने केला अॅसिडने हल्ला…अन्…
सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या हातावर प्लास्टर, स्वतः खुलासा करत दिली माहिती, दुखापतीचा व्हिडिओ व्हायरल