संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करी नेतृत्वाला डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या (artificial intelligence)अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “हे घटक कोणत्याही संघर्षात थेट सहभागी नसले तरी त्यांच्या अप्रत्यक्ष सहभागामुळे युद्धाचा मार्ग ठरत आहे.” त्यांनी यावेळी सैन्यदलांचे आधुनिकीकरण करण्यावर आणि राष्ट्रीय सुरक्षेला बळकट करण्यासाठी सरकारच्या पुढाकारावर भर दिला.
सिंह यांनी सांगितले की, देशांतर्गत संरक्षण उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून, याचा देशाला मोठा फायदा होईल. संरक्षण निर्यात २१,०८३ कोटी रुपये इतकी झाली असून, २०२८-२९ पर्यंत ती ५० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा उद्देश आहे. “सैन्यदलांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज केले जात असून, कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी ते सज्ज आहेत,” असे त्यांनी पुढे सांगितले.
याशिवाय, संरक्षणामध्ये ‘आत्मनिर्भरता’ वाढवण्यासाठी सरकार नियमित आढावा बैठका घेणार आहे, ज्यातून संरक्षणसज्जता आणि महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी जलदगतीने होईल.
हेही वाचा:
सेल्फी काढताना पाय घसरून तरुण आणि तरुणी इंद्रायणीत बुडाले; कुंडमळा येथील धक्कादायक घटना
राज्य कौशल्य विद्यापीठामुळे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणार
Vi युजर्ससाठी खुशखबर! अधिक चांगले कव्हरेज आणि वेगवान डेटा स्पीड मिळणार