मुंबई : अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मोठे चढउतार पाहायला मिळाले. सध्या मुंबई शेअर(penny stock) बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स हा 80604.97 वर पोहोचला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांक 24606.90 वर पोहोचलाय. दरम्यान, सध्या बाजार पुन्हा सावरल्यामुळे काही पेनी स्टॉक्स सध्या चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. यामध्ये अशाच एका पेनी स्टॉकचा समावेश असून गेल्या काही दिवसांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. सध्या या स्टॉकचे मूल्य हे 15 रुपयांपेक्षाही कमी आहे.
मेडिकल डिस्पोजेबल, फार्मास्यूटिकल आणि फूड अँड बेवरेज पॅकेजिंगसाठी (penny stock)माउल्ड तयार करणाऱ्या या कंपनीचे नाव गुजरात टुलरूम आहे. या कंपनीचा शेअर पेनी स्टॉक श्रेणीत मोडतो. भांडवली बाजाराच्या तुलनेत हा स्टॉक नॅनो कॅप कंपनींच्या श्रेणीत मोडतो. सध्या या स्टॉकचे मूल्य 14.86 रुपये आहे. सध्या या कंपनीचे बाजार भांडवल 173.36 कोटी रुपये आहे.
बुधवारी गुजरात टुलरूम या शेअरला अपर सर्किट लागले होते. बुधवारी हा शेअर 4.94 टक्क्यांनी वाढून 14.86 रुपयांवर बंद झाला होता. हे मूल्य गेल्या तीन महिन्यांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. या शेअरचे गेल्या 52 आठवड्यांतील सर्वोच्च मूल्य 45.95 रुपये होते.
सध्या या शेअरने दिलेल्या रिटर्न्सचा अभ्यास करायचा गेल्या काही महिन्यांत या शेअरने चांगले रिटर्न्स दिलेले नाहीत. गेल्या एका आठवड्यात या शेअरने 3.12 टक्क्यांनी रिटर्न्स दिलेले आहे. तर एका महिन्याच्या तुलनेत गुंतवणूकदारांचे 1.91 टक्के आणि 3 महिन्यांच्या तुलनेत 34.33 टक्क्यांचे नुसकसान झालेले आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून या शेअरच्या मूल्यात साधारण 60 टक्क्यांनी घसरण झालेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअरचे मूल्य घसरलेले असले तरी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करायचा झाल्यास, या कंपनीने गेल्या दहा वर्षांत 11 हजार टक्क्यांपेक्षाही अधिक रिटर्न्स दिलेले आहेत. गेल्या एका वर्षात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिलेले आहेत. तर दोन वर्षांच्या गुंतवणुकीत या कंपनीने 1,240 टक्के रिटर्न्स दिलेले आहेत.
3 वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना 2,150 टक्क्यांनी, तर 5 पाच वर्षांत 3,440 टक्के, 10 वर्षांत 11,330 टक्के रिटर्न्स दिलेले आहेत. सध्या या कंपनीला 150 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळालेली आहे. त्यामुळे भविष्यात या कंपनीच्या शेअरचे मूल्य आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
‘…तर तिसऱ्या दिवशी तो वेडापिसा होतो,’ मोहम्मद शमीच्या जवळच्या मित्रानेच केला खुलासा
जुळ्या मुलांची एक आई 2 वडील, कसं शक्य आहे? काय आहे ‘हेटरोपैटरनल सुपरफेकंडेशन’
40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कुलबस रुळावरच अडकली, समोरुन आली भरधाव ट्रेन अन्…