जळगाव जिल्ह्यातील पहुर येथे भव्य श्रीराम (monkey)मंदिर उभारणीसाठी अनेक दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती. मात्र, मंदिराच्या नव्या आराखड्यात २० फूट उंच हिरा मारुतीची मूर्ती अडथळा ठरत असल्याने, तिला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून मूर्ती हलवण्याचे कसोशीचे प्रयत्न सुरू होते. अखेर, सर्व अडचणींवर मात करून मूर्ती स्थलांतराचा अंतिम टप्पा सुरू झाला. मात्र, त्याचक्षणी अचानक वानरांची मोठी सेना मंदिर परिसरात धावून आली. या अनपेक्षित घटनेनं संपूर्ण गावात खळबळ माजली.

श्रीराम मंदिराच्या नव्या उभारणीसाठी मंदिर समितीने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु होते. मंदिराचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन तथा त्यांच्या सहकार्याने भरीव आर्थिक मदत मिळवली. त्यांच्या प्रयत्नांमुळे मंदिर उभारणीसाठी(monkey)आवश्यक निधी उपलब्ध झाला. मात्र, मूर्तीच्या जागेमुळे आराखड्यात अडथळा निर्माण झाल्याने तिचे स्थलांतर अपरिहार्य होते.

जेव्हा मूर्ती स्थलांतर करण्याचे काम सुरू होते, तेव्हा अचानक वानरांची मोठी सेना मंदिराभोवती गोळा झाली. काही वानर थेट मूर्तीच्या दिशेने झेपावत होते, तर काही (monkey)स्थलांतराच्या कामात गुंतलेल्या कार्यकर्त्यांभोवती घुटमळत होते. हे दृश्य पाहून उपस्थित भाविक स्तब्ध झाले. गावकऱ्यांनी त्वरित या घटनेला हनुमानाची कृपा मानली आणि मंत्रोच्चार, आरती, पूजन सुरू केले. काहींनी वानरांना फळे अर्पण केली, काहींनी जय हनुमानच्या गजरात मूर्ती स्थलांतराचे काम सुरू ठेवले.अखेर काही वेळानंतर वानर स्वतःहून मंदिर परिसरातून निघून गेले, आणि मूर्तीचे स्थलांतर यशस्वीरीत्या पूर्ण झालं. या अद्भुत घटनेनंतर पहुरमध्ये एक अनोखी भक्तीमय ऊर्जा निर्माण झाली आहे.
हेही वाचा :
भाषण सुरू असतानाच मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली
इचलकरंजी शहरात पाणीपुरवठ्याच्या समस्येसंदर्भात जोरदार निदर्शने; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात नागरिकांचा रोष
दहावीच्या विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ पाठवला? मुख्याध्यापकाने स्वत:ला संपवलं
रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याचं गुपित उघड? बच्चन म्हणाले, “ती माझी…”
सुपरस्टार प्रभास लवकरच अडकणार लग्न बंधनात? ‘या’ मुलीशी जोडले नाव
‘तारक मेहताच्या’ ; चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज, अखेर द्याबेनची होणार एन्ट्री!