अरविंद केजरीवाल यापुढे कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत; काँग्रेसच्या बड्या नेत्याने डिवचलं

नवी दिल्ली : फेब्रुवारी 2025 मध्ये दिल्लीत विधानसभा(political news) निवडणुका होणार आहेत. दिल्ली निवडणुकीतील महत्त्वाची लढत आम आदमी पार्टी (आप) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यात आहे. दिल्लीतील सर्व 70 विधानसभा जागांसाठी आपचे उमेदवार जाहीर केले आहेत, तर काँग्रेसने 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

भाजपमध्ये(political news) सध्या नावांची चर्चा सुरू आहे. तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसने वेगवेगळे लढणार आहेत. अशातच काँग्रेस नेते संदीप दिक्षित यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे,

संदीप दीक्षित म्हणाले की, अरविंद केजरीवाल यानंतर कधीही दिल्लीचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना स्पष्टपणे आदेश दिले आहेत. आम्ही त्यांना तुरुंगातून बाहेर येण्याची परवानगी दिली असली तरीही दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून ते कोणत्याही फाईलवर सही करू शकणार नाहीत. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात जाता येत नाही. कोणत्याही अधिकाऱ्याला भेटता येत नाही. अधिकाऱ्यांनाही आदेश देता येणार नाही. म्हणजेच केजरीवाल यांना मुख्यमंत्री होण्याचा अधिकार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर दुसऱ्याची नियुक्ती करणे त्यांच्यासाठी मजबुरी बनले आहे आणि आजही त्यांना जामिनाची अट लागू होते. उद्या ते मुख्यमंत्री झाले आणि अधिकाऱ्यांना फोन करून काहीतरी सही केली तर जामीन अट मोडली जाईल. जामिनाची अट मोडताच केजरीवाल) तुरुंगात जातील. त्यांना मुख्यमंत्री होणे शक्य नाही.

नवी दिल्लीतून काँग्रेसने संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या जागेवर आमदार आहेत. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांनी या जागेवर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पराभव केला होता.

तेव्हापासून ते या जागेवरून सतत आमदार आहेत. यावेळी संदीप आपल्या आईच्या पराभवाचा बदला घेण्यास सक्षम आहे का, हे पाहावे लागेल. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, ते फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

रवींद्र जडेजाच्या पत्रकार परिषदेत राडा…

सर्वसामान्यांना झटका! जीएसटी परिषदेने ‘तो’ निर्णय घेण्याचे टाळले; महागाईचा फटका बसणार

गुगलचा मोठा निर्णय, 10 टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ