पाऊस सुरू झाला म्हणून जोडपे धावत रिक्षात जाऊन बसले अन्…

सोशल मीडियावर आपल्याला रोज लाखो व्हिडिओ(video) पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे गमतीशी व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की, हसूनहसून पोट दुखून येते. तुम्ही कपल्सचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. कधी डान्सचे तर कधी भांडणाचे, तर एकमेकांना प्रमोज केल्याचे, त्यांच्या लग्नाचे असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक वेगळाच व्हिडिओ पाहायला मिळत आहे. जो पाहिल्यावर तुम्हाला तुमचे हसू आवरणार नाही.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने(video) अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडचा व्हिडिओ आहे. पाऊस येताच दोघांनी स्वत:ला पावसात भिजण्यापासून वाचवण्याचा विचार केला, मात्र अडोशाला जाताच असे काही झाले की, जे पाहून लोकांना हसू आवरता आले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओचा आनंद लुटला आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अचानक मुसळधार पाऊस पडायला सुरूवात होते. तिथेच रस्त्याच्या कडेला एक प्रेमी जोडपे उभे आहे. पाऊस थांबण्याची वाट बघत आहे. तिथे एक सायकल रिक्षाचालक असतो. तो त्यांना घरी घेभन नेण्यास तयार होतो.

मग दोघे धावत जाऊन रिक्षात बसतात. पण जेव्हा काही सेकंदानंतर असे काही घडते की ते पाहून हसू आवरणे कठीण होईल. खरंतर ते दोघे बसल्यानंतर रिक्षाचालक रिक्षा पुढे ओढतो पण ती पलटी होऊन मागे पडते. यामुळे ते दोघेही जोरात खाली पडतात. त्यानंतर रस्त्याने जाणारे त्यांना उठण्यास मदत करतात.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर meemlogy या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपले हसू आवरलेले नाही. मात्र, एका युजरने हसणाऱ्यांना म्हटले आहे की, तुमच्यासोबत असे झाले की तुम्हाला कळेल. ही हसण्यासारखी गोष्ट नाही. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, त्यांना मदत करणारे लोक चांगले आहेत. तर अनेकांनी या व्हिडिओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे.

हेही वाचा:

‘भूल भुलैया 3’ फेम सेलिब्रिटीचं निधन…

हेच ते प्रेम का? भररस्त्यात प्रियकराने केली प्रेयसीला मारहाण, Video Viral

10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना बसणार फटका; परीक्षेबाबत शिक्षणमंडळाने घेतला मोठा निर्णय