पुष्पा 2 रिलीज होताच फॅन्सने भररस्त्यात बाईकला लावली आग Video Viral

अव्हेटेड पुष्पा 2 चित्रपट 5 डिसेंबर रोजी सर्व चित्रपटगृहात (movie)प्रदर्शित झाला. यानंतर चाहते या चित्रपटासाठी इतके उत्साहीत झाले की लोकांनी चित्रपटगृहांपासून सार्वजनिक ठिकाणी एकच गोंधळ घातला. मागेच चित्रपट पाहण्यासाठी झालेल्या लोकांच्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आली. या घटनेनंतर चित्रपटाचा अभिनेता अल्लू अर्जुन याने पीडित कुटुंबाला 25 लाख रुपयांची भरपाई देणार असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ समोर आले ज्यामध्ये अनेक ठिकाणी चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतचे वेड पाहायला मिळाले.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यात काही लोक भररस्त्यात बाईकवर पेट्रोल शिंपडून आणि बाईकला आग लावून चित्रपटाच्या(movie) रिलीजचा आनंद साजरा करताना दिसून येत आहे. एवढेच काय तर यानंतर हे सर्व फॅन्स आगीच्या या ज्वलंत प्रकाशात नाचताना देखील दिसून आले. चित्रपटासाठीचा असाहा आनंद लोकांनी पहिल्यांदाच इतक्या हिंसक पद्धतीने व्यक्त होताना दिसून येत आहे. व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला दंग करतील.

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एका ठिकाणी लोकांची गर्दी जमली आहे. जो पुष्पा 2 चित्रपटाच्या रिलीजचे सेलिब्रेशन करत आहे. या दरम्यान काही लोक कागदाच्या तुकड्यांना आग लावून आनंदाने नाचत आहेत. दरम्यान, एका व्यक्तीने तेथे उभ्या असलेल्या दुचाकीवर पेट्रोल टाकले आणि त्यावर माचिसची काडी फेकली. पुढच्याच क्षणी बाईक पेटते आणि जळू लागते.

बाईकला आग लागताच तिथले लोक आणखीनच उत्तेजित होतात आणि सर्वजण उड्या मारून आनंद साजरा करू लागतात. यातील अनेकांच्या हातात अल्लू अर्जुनचे पोस्टर देखील होते, ज्याला हातात मिरवून ते आनंद साजरा करत असतात. चित्रपटासाठीचा असा हा आगळावेगळा आनंद पाहून आता अनेकजण आवाक् झाले आहेत.

हा व्हायरल व्हिडिओ @saiclips_09 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. शेअर केलेला हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातील कर्नूल शहरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “छपरी फॅन्स” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तुम्हाला बाईकची किंमत माहित नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्यामुळेच शिक्षणाची गरज आहे”.

हेही वाचा :

“सनातन जागृतीचा हुंकार: ‘अमेरिकेचा अध्यक्ष आम्ही निवडू’; रामगिरी महाराजांचे हिंदू मोर्चातून वक्तव्य”

जनतेला मोफत रेशनवर किती दिवस जगवणार, रोजगार निर्मितीवर काम करा; सुप्रीम कोर्टानं सरकारला झापलं

‘मी राज कुंद्राला आजपर्यंत केवळ एकदाच…’; ED चौकशीनंतर अश्लील Video प्रकरणात अभिनेत्रीचा खुलासा