बदलत्या काळानुसार आता अनेक गोष्टी बदलल्या. आता प्रत्येक गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या आहेत. आता कुठे जायचे असले की घरबसल्या आपण आपल्या फोनच्या मदतीने कॅब किंवा रिक्षा(rickshaw) बुक करू शकता. ऑनलाईन राइड बुक केल्याने आपला बराच वेळ वाचतो आणि कामाच्या जागीही पटकन पोहचता येते. पण रिक्षा टॅक्सीची ही ऑनलाईन बुकिंग जितकी सोयीस्कर आहे तितकीच ती कधी त्रासदायक सुद्धा ठरू शकते. याचेच एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला आजच्या व्हायरल व्हिडिओतून दिसून येत आहे.
सध्या एका तरुणीसोबत एक धक्कादायक घटना घडून आली. तरुणीने एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून रिक्षा (rickshaw) बुक करताच काही क्षणात ती राइड कॅन्सल केली. मग काय. राइड कॅन्सल करताच रिक्षा चालकाला राग अनावर झाला आणि रंगाच्या भरात तो तरुणीला खडेबोल सुनावू लागला. यानंतर तरुणी आणि रिक्षाचालकांमध्ये वाद सुरु झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे या वादावादीत रिक्षाचालकाने चक्क तरुणीला थोबाडीत मारले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, एका तरुणीने ऑनलाईन अॅपवरून ऑटो रिक्षा बूक केली होती. त्यानंतर आपल्या मैत्रीणीसोबत ती या रिक्षामध्ये बसली. पण रिक्षा सुरू होताच तिनं कुठल्याशा कारणामुळे राईड कॅन्सल केली. अर्थातच ही बाब रिक्षावाल्याला काही आवडली नाही अन् तो रागाच्या भरात तरुणींशी भांडू लागला. दरम्यान तरुणींनी पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली. पोलीस हा शब्द ऐकताच रिक्षाचालक आणखीन भडकला आणि त्याने तरुणीच्या कानशिलात लगावले. ही सर्व घटना तरुणीने आपल्या कॅमेरात कैद केली आणि याचाच व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @karnatakaportf नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये संपूर्ण घटनेविषयी माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करून या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. कमेंट्समध्ये काहींनी रिक्षाचालकाला सपोर्ट केला आहे तर काहींनी त्याचे कृत्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा:
आज हरतालिका व्रत, ‘या’ 5 राशींवर राहील शिव-पार्वतीची कृपा
लाडकी बहिण योजनेचा नवीन अर्ज; 4500 रुपये मिळवण्यासाठी माहिती
राहुल गांधींचा हल्लाबोल; पंतप्रधान मोदींनी जीएसटी, नोटाबंदी आणि कृषी कायद्यांसाठी देशवासीयांची माफी मागावी