नाशिक : प्रचारतोफा थंडावताच राज्यात(political) अनेक ठिकाणी सत्ताधारी व विरोधक आमनेसामने आले आहे. नाशिकमध्ये भाजप-ठाकरे व पवार गटात राडा झाला तर पालघरमध्ये शिंदे व ठाकरे गटाचे समर्थक भीडले. तसेच गंगापुरात अपक्ष उमेदवारावर दगडफेक करण्यात आली. या घटनांमुळे त्या-त्या मतदारसंघात तणावाचे वातावरण आहे.
नाशिक पूर्व विधानसभा(political) मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेने (उबाठा) च्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. मविआचे उमेदवार गणेश गिते यांच्याकडून पैसे वाटप सुरू असल्याचा भाजपाचा आरोप आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी गणेश गिते यांच्या कार्यकर्त्याची गाडीही फोडली. विशेष म्हणजे, तीन दिवसांपूर्वीही नाशिकमध्ये अशीच घटना घडली होती.
दरम्यान, आजच्या घटनेवेळी पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. नाशिकच्या पंचवटी परिसरात भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला. या घटनेनंतर पोलिसांकडून सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला आहे.
पालघर शहरातील विष्णूनगर परिसरातील वर्धमान गृहनिवासी संकुलामध्ये पैसे वाटपावरून शिंदे व ठाकरे गटात राडा झाला. शिंदे गटाचे नगरसेवक पैसे वाटप करत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नगरसेवक रवींद्र म्हात्रे व अमोल पाटील यांनी पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाने केला आहे. माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रवींद्र म्हात्रे यांची कार ताब्यात घेतली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी म्हात्रे यांची कार तक्रारदार यांच्यासमोर तपासली असून गाडीत पोलिसांना काहीही आढळले नाही.
छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराच्या गाडीवर हल्ला झाला. अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. गळणीम रोडवर सोनवणे यांची गाडी अडवत 10 ते 15 लोकांच्या जमावाने दगडफेक केली. यात सोनवणे यांच्यासह तीन ते चार जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी वाळूज टोल नाक्याजवळील जवळील सीएसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा :
करदात्यांना सूट मिळणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
नवऱ्याकडून छळ झाला सांगताना भाजप उमेदवाराला रडू कोसळले?
कश्मीरा शाहचा लॉस एंजिल्समध्ये झाला गंभीर अपघात; कपड्यांचा फोटो शेअर करत म्हणाली…