मुंबई : ठाणे शहर नेहमीच वाहतुकीच्या दृष्टीने वर्दळीचे समजले(water) जाते, आणि आता तर सीएम शिंदेंचे ‘ठाणे’ अशी ठाण्याला एक नवी ओळख मिळाली आहे, पण ठाण्यातील एका विचित्र घटनेने ठाण्यातील रिक्षा चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठाण्यात एका रिक्षा चालकाकडून पादचारी नागरिकावर रस्त्यावरील पावसाचे पाणी(water) उडाले हीच बाब झाल्यानंतर शहबाज खान या नागरिकाने थेट चाकू हातात घेत रिक्षा चालकाला दम भरला तसे जीवे मारण्याची धमकी दिली. रिक्षा चालक घटनेत गंभीर जखमी झाला आहे, चाकूने वार केल्यामुळे रिक्षा चालक पूर्णपणे घाबरुन गेला, घटनेने रिक्षा चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
शुक्रवारी सांयकाळी ५.३० च्या सुमारास घोडबंदर परिसरात घटना घडली, त्यानंतर पाणी उडाल्यामुळे रागावलेल्या शहबाज खान आणि रिक्षाचालकात भांडण सुरु झाली, भांडणाचे स्वरुप रौद्र झाले आणि खान नामक व्यक्तीने थेट चाकू काढत रिक्षा चालकावर धावून गेला, अशी माहिती रिक्षाचालकाने एफआयआर नोंदवताना दिली आहे. या घटनेनंतर रिक्षा चालक संघटना कठोर कारवाईची मागणी करत आहे.

पोलीसांनी पुढे माहिती दिली की, वादाची मुळ सुरुवात चिखलामुळे झाली, रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साठले होते, रिक्षा चालक रिक्षा नेताना रिक्षाचे एक चाक त्या खड्ड्यात गेले आणि चिखलाचे पाणी शहबाज खान याच्या अंगावर उडाले त्यानंतर बाचाबाची झाली आणि रिक्षा चालक भाडे सोडण्यासाठी पुढे निघून गेला पण परत त्याच मार्गावरुन रिक्षा परतत असताना रिक्षा चालकावर शहबाज खान चाकू घेवून धावून गेला आणि भांडणांचे स्वरुप बदलले शहनाजने रिक्षा चालकावर सपासप वार केले अशी माहिती मिळत आहे.
रिक्षा चालकाच्या तक्रारीवरुन पोलीसांनी भारतीय न्याय संहितानुसार (इंडियन पॅनल कोड) गुन्हा दाखल करुन घेतला आहे. यामध्ये गैर परिरोध (१२७-१), गंभीर दुखापत (११८-१), दुखापत (११५ -२), हेतुपरस्पर अपमान (३५२) आणि गुन्हेगारी दहशतवाद (३५१ -२) कलमातर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा चालकावर रुग्णालयात पुढील उपचार सुरु आहेत.
हेही वाचा :
मोठी बातमी! अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार नाहीत?
विराट-अनुष्का भारत सोडणार असल्याच्या चर्चांदरम्यान समोर आला नवा फोटो
विशाळगड अतिक्रमण प्रकरण तापलं! स्थानिकांना अज्ञातांकडून मारहाणीचा आरोप