शिंदे, अजित पवारांनाच विचारा ते पक्ष फोडून..; फोडाफोडीच्या राजकारणावर केंद्रीय मंत्र्याची रोखठोक भूमिका

देशाचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील(political news today) राजकारणासंदर्भात सूचक विधान केलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भारतीय जनता पार्टीने फूट पाडलेली नसून त्या पक्षांमधील जे नेते पक्ष सोडून आमच्याकडे आले त्यांनाच विचारायला हवं की त्यांनी असं का केलं? यामध्ये भाजपाचा काहीच दोष नाही, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. त्यांना आमच्याबरोबर यायचं होतं तर आम्ही त्यांना परत जायला का सांगावं? असा प्रतिप्रश्नही सिंह यांनी विचारला आहे.

महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे 2 गट पडले आहेत. एक गट विद्यमान मुख्यमंत्री(political news today) एकनाथ शिंदेंचा असून दुसरा गट उद्धव ठाकरेंचा आहे. तसेच मागील वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला असून शरद पवार गट विरोधकांच्या महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे. शिंदे गटाला पाठिंबा जाहीर करत त्यांचे नेते एकनाथ शिंदेंना भाजपाने थेट मुख्यमंत्रीपदी दिलं.

राज्यातील भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि त्यानंतर अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. याच घडामोडींसंदर्भात आणि महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल ‘न्यूज 18 हिंदी’ला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे आपली मतं मांडली.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या मदतीशिवाय भाजपाला लोकसभा निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करता आली नसती का? असा प्रश्न राजनाथ सिंह यांना विचारला. “शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील ज्या नेत्यांनी पक्ष फोडला त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की त्यांनी असं का केलं?” असं उत्तर राजनाथ सिंह यांनी दिलं.

“कोणी स्वत:चा पक्ष फोडून आमच्याबरोबर येऊ इच्छित असेल तर आम्ही त्याला असं म्हणून शकत नाही की आम्ही तुम्हाला स्वीकारणार नाही,” असंही राजनाथ सिंह म्हणाले. म्हणजेच फोडाफोडीच्या राजकारणासाठी भाजपाला जबाबदार धरण्याऐवजी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीच त्यांचे पक्ष का फोडले आणि ते भाजपाबरोबर का आले हे सांगावं असं राजनाथ सिंह यांना सूचित करायचं आहे.

“केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी हे नेते आमच्याकडे आल्याचा दावा विरोधक करत आहेत. आता विरोधकांचं म्हणणं आहे की ते (भाजपाबरोबर आलेले नेते) दोषी आहेत. मात्र हेच फुटून आलेले गट जेव्हा विरोधकांच्या सरकारचा भाग होते तेव्हा ते निर्दोष असल्याचं विरोधकच सांगत होते. त्यावेळेस ते ईडी आणि सीबीआयची कारवाई चुकीची असल्याचं सांगत होते,” असा टोलाही राजनाथ सिंह यांनी लगावला.

शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपा एकत्र आल्यानंतर आता एकनाथ खडसेंना पुन्हा भाजपामध्ये यायचं असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात विचारण्यात आलं असता राजनाथ सिंह यांनी, “त्यांना कोणी आणलं नाही ते स्वत: आले आहेत. असे अनेक नेते आहेत जे असा विचार करत आहेत की 2047 पर्यंत भारत विकसित देश झाला पाहिजे. या मोहिमेचा भाग होण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीच ते आमच्या पक्षात आले आहेत,” असं उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील नाराजीमुळे खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र आता पुन्हा स्वगृही परतण्यासाठी खडसेंचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.

राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींविरोधात चुकीचे शब्द वापरण्यावरुनही इशारा दिला आहे. पंतप्रधानांविरुद्ध बोलताना सजग राहायला हवं. पंतप्रधान ही केवळ एक व्यक्ती नसते तर संस्था असते. सुदृढ लोकशाहीमध्ये अशा वागणुकीला कोणतेही स्थान नाही, असं राजनाथ म्हणाले.

हेही वाचा :

बच्चन कुटुंबांच्या घरात घुमणार शहनाईचे सूर, नव्या नंदा करणार लग्न ?

महाराष्ट्रात लवकरच मोठा राजकीय भूकंप ? महायुतीला धक्का; ‘हा’ बडा नेता तुतारी हाती घेणार

आता तुमच्या फोनमध्येच समजणार अनोळखी नंबरची ओळख; गुगल लवकरच देणार खास फीचर!